Lokmat Sakhi >Food > वाडगाभर सायीचे घरीच करा रवाळ साजूक तूप, कमी वेळात शुद्ध तूप घरीच करण्याची रेसिपी

वाडगाभर सायीचे घरीच करा रवाळ साजूक तूप, कमी वेळात शुद्ध तूप घरीच करण्याची रेसिपी

How to make Ghee from Malai at Home : भेसळयुक्त तूप न खाता तुम्ही घरच्याघरी तूप बनवू शकता. (Ghee Making Tips)

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:16 PM2023-08-31T13:16:54+5:302023-08-31T15:27:38+5:30

How to make Ghee from Malai at Home : भेसळयुक्त तूप न खाता तुम्ही घरच्याघरी तूप बनवू शकता. (Ghee Making Tips)

How to make Ghee from Malai at Home : How To Make Homemade Ghee From Malai | वाडगाभर सायीचे घरीच करा रवाळ साजूक तूप, कमी वेळात शुद्ध तूप घरीच करण्याची रेसिपी

वाडगाभर सायीचे घरीच करा रवाळ साजूक तूप, कमी वेळात शुद्ध तूप घरीच करण्याची रेसिपी

रोजच्या स्वयंपाकासाठी तूपाचा वापर केला जातो. तूप तब्येतीसाठी चांगलं म्हणून अनेकजण तेलाऐवजी तुपाच्या पदार्थ बनवताना. फोडणी देण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करतात. (How to make ghee at home) मार्केटमध्ये वेगवगेळ्या ब्रॅण्डसचे तूप, तेलाचे डबे उपलब्ध असतात. (How to make Ghee from Malai at Home) भेसळयुक्त तूप न खाता अस्सल चवीचे तूप तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. (Ghee Making Tips)

1) घरच्याघरी तूप बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूध गरम करायला ठेवा. दूध व्यवस्थित गरम झाल्यानंतर रूम टेम्परेचरवर आल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर दूधावर घट्ट साय तयार होईल. सकाळी साय काढून एका भांड्यात ठेवा. १ ते २ आठवडे साय साठवून एका डब्यात ठेवा. 

2) ज्यावेळी तुम्हाला तूप बनवायचे असेल तेव्हा साठवलेली साय एका भांड्यात काढा आणि  चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घ्या. एका कढईमध्ये मंद आचेवर हे फेटलेलं मिश्रण घाला आणि सतत हलवत राहा. मलईचा  रंग बदलून ब्राऊन होईपर्यंत शिजू द्या. नंतर गॅस बंद करून तूप गाळून घ्या तयार आहे घरगुती तूप. साठवलेल्या मलईपासून तूप बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.

३) अनेकांना तुपाचा वास अजिबात आवडत नाही. यामुळे ते घरी तूप बनवणं टाळतात. अशावेळी तुम्ही तुपाचा  स्मेल येऊ नये म्हणून कढईत लोणी किंवा मलई घातल्यानंतर त्यात लिंबाचे साल घालून गॅसवर ठेवा. जेव्हा याचा रंग पिवळसर होईल तेव्हा गाळणीने काढून घ्या आणि तुप दीर्घकाळ स्टोअर करून ठेवा. 

४) लोणी जोपर्यंत पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत चमच्याने हलवत राहा. तुपात पाणी राहिलं किंवा ओलसरपणा असेल तर बुरशी लागण्याची भिती असते.

५) तूप बनवण्याच्या २ ते ३ तास आधीपासून साठवलेली मलई बाहेर काढून ठेवा. तुपाचा टेक्चर चांगला होण्यासाठी तुम्ही मलईमध्ये दही मिसळून फेटून घ्या. यामुळे मलईला मऊपणा येईल. घरी तूप बनवत असताना लोणाचे दाणे पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. कारण आधीच गॅस बंद केला तर कमी तूप येईल.

Web Title: How to make Ghee from Malai at Home : How To Make Homemade Ghee From Malai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.