बाजारात कित्येक प्रकारचे तूप विकत मिळतात. अगदी गाईचं तूपही मिळतं. आपण खूप जास्त पैसे खर्च करून ते तूप विकत घेताे. पण तरीही घरच्या साजुक तुपाला जी चव असते ती विकत मिळणाऱ्या महागड्या तुपाला नसते. त्यामुळे घरीच तूप करण्याचा अनेकींचा प्रयत्न असतो. पण काही जणींना खूप इच्छा असूनही घरी तूप करता येत नाही. कारण सायीपासून तूप करण्याची जी प्रक्रिया असते ती खूपच वेळखाऊ असते आणि त्यासाठी एवढा वेळ देणं त्यांना जमत नाही. बहुतांश जणींच्या याच अडचणीवर आता एक मस्त तोडगा पाहा.. ही रेसिपी वापरून तुम्ही सायीपासून थेट तूप काढू शकता (How To Make Ghee From Malai?). या रेसिपीचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला खवा सुद्धा मिळेल.. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(easy recipe of making ghee from malai without making makhkhan)
सायीपासून तूप काढण्याची पद्धत
आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीनुसार आपण जी साय जमा करतो त्या सायीमध्ये दही टाकून ती काही तासांसाठी विरझायला ठेवतो. यानंतर ती साय फेटून त्यापासून लोणी तयार केलं जातं आणि लोणी कढवून मग त्यापासून तूप होतं.
इस्त्री गंजून गेली असल्यास कशी स्वच्छ करावी? २ सोपे घरगुती उपाय- इस्त्री चमकेल नव्यासारखी
पण आता हे सगळं करण्याची अजिबातच गरज नाही. सायीपासून थेट तूप कसं तयार करायचं याची रेसिपी manjumittal.homehacks या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
या रेसिपीनुसार सगळ्यात आधी गॅसवर कुकर गरम करायला ठेवा आणि त्यात थोडं पाणी घाला. यानंतर आता तुम्ही जी साय जमवली आहे ती साय कुकरमध्ये टाका. एकदा साय फेटून एकसारखी करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून घ्या. २ ते ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा.
टरबूज खाऊन बिया टाकून देऊ नका! अतिशय गुणकारी असलेल्या टरबूज बियांचे वाचा ५ फायदे
यानंतर कुकर थंड होऊ द्या. कुकरचं झाकण काढलं की पुन्हा २ ते ३ मिनिट गॅस चालू करा. यावेळी मिश्रण वारंवार हलवत राहा. अवघ्या काही मिनिटांतच तूप आणि खवा दोन्ही वेगळं झालेलं दिसेल. यानंतर तूप गाळून घ्या.