भारतीय घरांमध्ये तुपाचा वापर हमखास होतो. तूप खाल्ल्याने शरीर सुदृढ राहते. तुपाचा वापर आपण विविध पदार्थांमध्ये करतो. पदार्थांमध्ये तूप घातल्याने त्याची चव दुपट्टीने वाढते. 'खा तूप येईल रूप' ही म्हण आपण ऐकलीच असेल. त्यात ओमेगा ३, ओमेगा ९, फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ए , के ई सारखे कित्येक पोषक तत्व असतात. ज्याचा फायदा सौंदर्यालाच नसून, आरोग्याला देखील होतो (Homemade Ghee).
बरेच जण मार्केटमधून तूप विकत आणतात. पण बऱ्याचदा बाजारातून आणलेलं तूप भेसळयुक्त असते. त्यामुळे घरातच साय साठवून तूप तयार करा (Cooking Tips). तूप कढवणे सोपी गोष्टी नाही. यात भरपूर वेळ आणि भांड्यांचा देखील वापर होतो. जर आपल्याला झटपट तूप कढवायचं असेल तर, प्रेशर कुकरमध्ये तूप तयार करा(How to make ghee in pressure cooker).
प्रेशर कुकरमध्ये तूप कढवण्यासाठी लागणारं साहित्य
दुधाची साय
पाणी
गव्हाचं पीठ
ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी
हळद
कृती
सर्वप्रथम, प्रेशर कुकरमध्ये साठवलेली साय घाला. गॅसवर प्रेशर कुकर ठेवा. नंतर सायमध्ये २ चमचे पाणी, एक चमचा गव्हाचं पीठ, चिमुटभर हळद घालून मिक्स करा. नंतर त्यावर प्रेशर कुकरच झाकण लावा, व मध्यम आचेवर गॅस ठेवा. २ शिट्ट्या झाल्यानंतर प्रेशर कुकरच झाकण उघडा, व २ मिनिटांसाठी गॅस कमी आचेवर ठेवून तूप कढवून घ्या.
भाजीसाठी वाटण-ग्रेव्ही बनवायला वेळच मिळत नाही? घरगुती मसाल्याची बनवा हॉटेलस्टाईल ग्रेव्ही..
आपण पाहू शकता प्रेशर कुकरच्या २ शिट्ट्यांमध्ये रवाळ तूप तयार होईल. काही वेळानंतर तयार मावा दिसेल. त्याचा रंग हलका तपकिरी झाल्यावर गॅस बंद करा, व गाळणीने गाळून तूप हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे बाजारात मिळते तसे, रवाळ तूप घरच्या घरी काही मिनिटात रेडी.