स्वयंपाक करताना चपातीवर लावण्यासाठी, वरण भातावर घेण्यासाठी तसंच गोड पदार्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. मार्केटमध्ये भेसळयुक्त तूप मोठ्या प्रमाणात विकले जाते. (Cooking Tips) खासकरून खाण्यापिण्याच्या पदार्थांबाबत लोकांनी जागरूक राहायला हवं. घरात तयार झालेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. बाजारात मिळणारं तुप शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखं कठीणच असतं. (Easy Tips To Make Desi Ghee From Malai)
त्यामुळे बऱ्याच महिला घरातच तूप बनवतात. घरी तूप नीट बनत नाही, दुर्गंध येतो, तूप बनवताना गॅस वाया जातो. अशी अनेकांची तक्रार असते. पण ही तक्रार टाळण्यासाठी तुम्ही घरच्याघरी प्रेशर कुकरमध्ये तूप बनववू शकता. ही सोपी ट्रिक तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवले. (How To Make Ghee In Pressure Cooker)
घरी तूप बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी दूध गरम केल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावं लागेल आणि त्यावर येणारी जाड मलई एका स्वच्छ डब्यात काढून ठवावी लागेल. भरपूर साय जमा झाल्यानंतर तुम्ही त्यातून तूप काढू शकता. साय हातानं किंवा ताक घुसळण्याच्या साधनानं मलई घुसळून घ्या.
प्रेशर कुकरमध्ये तूप कसं बनवायचं?
तूप काढण्यासाठी प्रेशर कुकर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. नंतर कुकरमध्ये लोणी घाला नंतर काही मिनिटातंच मलई वितळेल. लोण्याला पाणी सुटल्यानंतर उकळ येऊ द्या आणि मध्ये मध्ये चमच्यानं हलवत राहा. अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिसळून नंतर झाकण लावा.
२ शिट्ट्यांमध्ये तूप तयार असेल
हा सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. २ शिट्टया आल्यानंतर गॅस बंद करा. प्रेशर कुकरमधून वाफ निघातल्यानंतर झाकण बाजूला काढा. या पद्धतीनं कमीत कमी वेळात घरी शुद्ध तूप बनून तयार होईल. तुम्ही तूप गाळणीनं गाळून जार किंवा बॉटलमध्ये स्टोअर करू शकता.
तूप बनवण्यासाठी तुम्ही १ ट्रिक वापरू शकता ती म्हणजे कुकरमध्ये थोडं पाणी घेऊन त्यात मलई घाला. गॅसवर ठेवल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा. कुकरचं झाकण लावून २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. कुकरची वाफ निघाल्यानंतर झाकण उघडल्यास तुम्हाला तूप तरंगताना दिसेल. नंतर पुन्हा गॅस सुरू करून ४ ते ५ मिनिटांसाठी शिजवा. काही वेळातच तूप वेगळं झालेलं दिसेल.