सण - उत्सावाच्या काळात घरी दुधाचा वापर जास्त प्रमाणात होतो. अशावेळी दुधाची साय जास्त प्रमाणात साचते. काही गृहिणी घरात साय साठवून ठेवतात. व त्याचे तूप तयार करतात. बाहेरील भेसळयुक्त तुपापेक्षा घरी तयार केलेले तूप आरोग्यासाठी उत्तम ठरते. मात्र, धावपळीच्या या जीवनात अनेकांना तूप तयार करायला जमेलच असे नाही. त्यामुळे काही लोकं मार्केटमधील तूप खाण्यास प्राधान्य देतात.
तेलापेक्षा तूप आपल्या आरोग्यासाठी कित्येक पटीने फायदेशीर आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. जर आपल्याकडे तूप करण्यासाठी वेळ नसेल, पण घरचंच तूप खाण्याची इच्छा असेल तर, कुकरच्या मदतीने घरी तूप तयार करा. या एका ट्रिकमुळे काही मिनिटात रवाळ तूप घरी तयार होईल(How to make ghee in slow cooker).
कुकरमध्ये तूप करण्यासाठी लागणारं साहित्य
साय
खाण्याचा सोडा
अळूवडी - कोथिंबीर वडी नेहमीचीच, आठवडाभर टिकतील अशा कोबीची खमंग वडी करण्याची सोपी कृती पाहा
पाणी
कृती
सर्वप्रथम, प्रेशर कुकरमध्ये एक कप पाणी घाला, त्यानंतर साठवलेली साय घाला. पाणी घातल्यामुळे कुकरच्या तळाशी साय चिकटणार नाही. नंतर त्यावर कुकरचं झाकण लावा. व गॅस मध्यम आचेवर ठेवा. कुकरची एक शिटी झाल्यानंतर कुकरचं झाकण काढा, व चमच्याने काही मिनिटे ढवळत राहा.
इडली डोसा नेहमीचाच, वाटीभर रव्याचा करा इन्स्टंट उत्तप्पा, मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन
नंतर त्यात चिमुटभर खाण्याचा सोडा घाला. व चमच्याने वारंवार ढवळत राहा. यामुळे तूप लवकर खराब होणार नाही, व त्यातून उग्रही वास येणार नाही. सायमधून तूप तयार होत आहे, असं दिसून येईल, तेव्हा त्यात अर्धा चमचा पाणी घाला. यामुळे तूप दाणेदार तयार होईल. व चमच्याने सतत ढवळत राहा.
काही वेळानंतर तयार मावा दिसेल. त्याचा रंग हलका तपकिरी झाल्यावर गॅस बंद करा. व गाळणीने गाळून तूप वेगळे करा. अशा प्रकारे बाजारात मिळते तसे, रवाळ तूप घरच्या घरी काही मिनिटात रेडी. आपण हे तयार तूप थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता.