Lokmat Sakhi >Food > फक्त ५ मिनिटांत करा आल्याची चटकदार चटणी, चव आणि रंग असे भारी की तोंडला सुटेल पाणी

फक्त ५ मिनिटांत करा आल्याची चटकदार चटणी, चव आणि रंग असे भारी की तोंडला सुटेल पाणी

How to make ginger chutney : तोंडी लावायला पटकन करता येईल अशी आल्याची चटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:42 PM2023-05-03T16:42:45+5:302023-05-04T14:33:52+5:30

How to make ginger chutney : तोंडी लावायला पटकन करता येईल अशी आल्याची चटणी

How to make ginger chutney : South Indian style ginger chutney | फक्त ५ मिनिटांत करा आल्याची चटकदार चटणी, चव आणि रंग असे भारी की तोंडला सुटेल पाणी

फक्त ५ मिनिटांत करा आल्याची चटकदार चटणी, चव आणि रंग असे भारी की तोंडला सुटेल पाणी

रोजच्या जेवणाला तोंडी लावणीसाठी चटण्या, पापड असं काही असेल तर जेवणाची मजाच वेगळी असते.  कितीही साधं जेवण असेल तरीही चटण्यांमुळे जेवणाला चव येते आणि खाणारेही पोटभर जेवतात. आल्याचा वापर प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात केला जातो. (Cooking Hacks & Kitchen Tips)  आल्याचे सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. आल्यात अनेक औषधी  गुणधर्म आहेत. (Ginger chutney recipe ) आल्याची चटणीसुद्धा तितकीच चविष्ट आणि चवदार लागते. आल्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया. (How to make ginger chutney)

आल्याची चटणी  बनवण्यासाठी सगळ्यात एका कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात चण्याची डाळ, धणे, लाल मिरच्या, कढीपत्ता, आल्याचे काप घालून व्यवस्थित परतवून घ्या. त्यात चिंचेचा  एक तुकडा घाला. हे साहित्य परतवून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे साहित्य  घाला. (What is South Indian red chutney made of) गूळ, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. एका वाटीत हे मिश्रण काढून घ्या. मोहोरी, जीर आणि लाल मिरचीची फोडणी तयार करून गरमागरम फोडणी या मिश्रणावर घाला. तयार आहे चटकदार आल्याची चटणी. (South Indian style ginger chutney)

 

१) कच्चं आलं पोटासाठी फायदेशीर मानलं जातं. यामुळे पचनतंत्र  मजबूत राहते. याशिवाय  पोटदुखीचा त्रासही कमी होतो. पोटदुखीची समस्या उद्भवत असल्यास तुम्ही कच्चं आलं खाऊ शकता.

२) मायग्रेनच्या उपचारांसाठीही कच्च आलं फायदेशीर ठरतं. मायग्रेनचा त्रास असल्यास रोज आल्याचं सेवन करायला हवं. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर  आल्याचे सेवन न चुकता करा.

३) कच्च आलं हृदयासाठी लाभदायक ठरते. आल्याच्या सेवनानं कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होण्यास मदत होते. म्हणूनच रोज आल्याचा समावेश आहारात करावा. 

पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ ट्रिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या-चवदार पुऱ्या

४) कच्चे आले पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तर आले पाचन तंत्र मजबूत करते. तसेच, जर एखाद्याला पोटदुखी  जळजळ यांसारख्या  तक्रारी जाणवत असतील तर अशा स्थितीत आल्याचे सेवन करू शकता.

५) मध आणि लिंबू घालून आल्याचा चहा घेतल्यास वजन कमी करण्यासही मदत होते.

Web Title: How to make ginger chutney : South Indian style ginger chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.