Lokmat Sakhi >Food > ना मिक्सर - ना पाटा वरवंटा; २ मिनिटात आलं - लसूण पेस्ट करण्याची सोपी ट्रिक; टिकेल महिनाभर

ना मिक्सर - ना पाटा वरवंटा; २ मिनिटात आलं - लसूण पेस्ट करण्याची सोपी ट्रिक; टिकेल महिनाभर

How To Make Ginger Garlic Paste at Home : अशा पद्धतीने घरी करा आलं - लसूण पेस्ट; बाजारातून पेस्ट आणण्याची गरज पडणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 03:22 PM2024-04-24T15:22:59+5:302024-04-24T15:24:11+5:30

How To Make Ginger Garlic Paste at Home : अशा पद्धतीने घरी करा आलं - लसूण पेस्ट; बाजारातून पेस्ट आणण्याची गरज पडणार नाही..

How To Make Ginger Garlic Paste at Home | ना मिक्सर - ना पाटा वरवंटा; २ मिनिटात आलं - लसूण पेस्ट करण्याची सोपी ट्रिक; टिकेल महिनाभर

ना मिक्सर - ना पाटा वरवंटा; २ मिनिटात आलं - लसूण पेस्ट करण्याची सोपी ट्रिक; टिकेल महिनाभर

आलं आणि लसूण, या दोन्ही गोष्टींचा भरपूर वापर स्वयंपाकात होतो. मुख्य म्हणजे यात शरीराला आवश्यक असणारे पोषक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे आरोग्याला पुरेपूर फायदा होतो. शिवाय आलं आणि लसूण, थोडं का असेना पदार्थात घालताच, पदार्थाची चव वाढते. आल्यामध्ये एंजाइम असतात, जे पचनसंस्था सुरळीत करते. शिवाय यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

लसूण देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. लसणामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी- बॅक्टेरिअल, अँटी - फंगल आणि अँटी - व्हायरल हे गुणधर्म आहेत. आपण अनेक पदार्थांमध्ये आलं - लसणाच्या पेस्टचा वापर करतो. ज्यामुळे पदार्थाची चव वाढते. पण विकतचे आलं - लसणाच्या पेस्टचा वापर करण्यापेक्षा, आपण घरातच फ्रेश आलं - लसणाची पेस्ट तयार करू शकता. मिक्सर किंवा पाटा-वरवंट्याचा वापर न करता, आपण काही मिनिटात झटपट आलं-लसूण पेस्ट तयार करू शकता(How To Make Ginger Garlic Paste at Home).

आंघोळीच्या पाण्यात मिसळा '४' पैकी '१' गोष्ट, दिवसभर राहाल कूल-फ्रेश; घामोळ्यांचा त्रास होईल छूमंतर

झटपट आलं-लसणाची पेस्ट करण्याची पद्धत

आलं लसणाच्या पेस्टशिवाय पदार्थाची चव वाढत नाही. पदार्थात आलं-लसूण पेस्ट घालताच त्याची चव दुप्पट वाढते. पण विकतचे आलं - लसूण पेस्ट कधी खराब होते. किंवा त्याची चव घरगुती तयार पेस्टसारखी येत  नाही. आलं - लसूण पेस्ट तयार करण्यासाठी आपण, मिक्सर किंवा पाटा-वरवंट्याची मदत घेतो. पण या दोघांचा वापर न करताही आपण आलं - लसणाची पेस्ट तयार करू शकता.

रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण..

यासाठी एक चॉपिंग बॉर्ड घ्या. त्यावर आलं चिरून आणि लसणाच्या काही पाकळ्या ठेवा. आता लाटणं घ्या. लाटण्याने आलं आणि लसूण मॅश करून घ्या. अशा पद्धतीने आलं - लसूण पेस्ट काही मिनिटात तयार होईल. शिवाय आपल्याला स्वयंपाकात वापरण्यासाठी फ्रेश आलं - लसणाची पेस्ट मिळेल. 

Web Title: How To Make Ginger Garlic Paste at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.