Join us

कशाला महागडी आलं- लसूण पेस्ट विकत घेता? ही रेसिपी पाहून घरीच तयार करा- महिनाभर टिकेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 17:09 IST

Food And Recipe: आलं- लसूण पेस्ट घरच्याघरी कशी तयार करावी आणि ती अनेक दिवस टिकवून ठेवण्यासाठी काय करावं (ginger garlic paste recipe), याची ही सोपी ट्रिक...(How to make ginger garlic paste that can be store for more than a month)

ठळक मुद्देजशी लागेल तशी ही पेस्ट काढून वापरा. पण दरवेळी त्याला ओला हात किंवा ओला चमचा लागणार नाही याची काळजी घ्या.

आपल्या रोजच्या स्वयंपाकात बऱ्याचदा आलं- लसूण घातलं जातं. हे दोन पदार्थ जर फोडणीला घातले तर भाज्यांची किंवा अन्य कोणत्याही पदार्थाची चव जास्त खूलते. पण दरवेळी आलं लसूण पेस्ट तयार करण्यात बराचसा वेळ जातो. त्यामुळे तयार केलेली आलं- लसूण पेस्ट हाताशी असेल तर वेळ वाचून बरेचसे काम सोपे होते. हल्ली बाजारात आलं लसूण पेस्ट मिळतात. पण त्यातही भेसळ असल्याचे आपण बऱ्याचदा ऐकतो (ginger garlic paste recipe). म्हणूनच अतिशय सोप्या पद्धतीने आलं- लसूण पेस्ट घरच्याघरी करून ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा चटकन वापरा..(How to make ginger garlic paste that can be store for more than a month)

 

महिनाभर टिकणारी आलं-लसूण पेस्ट कशी करावी?

साहित्य 

अर्धी वाटी लसूण 

पाव वाटी आलं

मुलांचे शाळेचे पांढरे सॉक्स खूपच मळकट होतात? २ पदार्थ वापरून धुवा- नव्यासारखे स्वच्छ होतील

दोन टेबलस्पून तेल 

दीड ते दोन टेबलस्पून लिंबाचा रस

एक ते दीड टीस्पून मीठ

 

कृती

सगळ्यात आधी आलं धुवून व्यवस्थित कोरडं करून घ्या. त्यानंतर त्याची सालं काढून टाका. आलं पुर्णपणे वाळल्यानंतरच त्याची पेस्ट तयार करायला घ्या. कारण आल्यात जर पाण्याचा ओलसरपणा राहीला तर पेस्ट काही दिवसांतच खराब होऊ शकते.

सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील

आलं किसून घ्या तसेच लसणाच्या पाकळ्याही सोलून घ्या. किसलेलं आलं आणि लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घाला आणि थोडंही पाणी न घालता त्याची अगदी बारीक पेस्ट करा.

 

ही पेस्ट एका भांड्यात काढा. त्यानंतर त्यामध्ये तेल, लिंबाचा रस आणि मीठ घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की आलं- लसूण पेस्ट झाली तयार.

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ, दिसतील सुंदर

ही पेस्ट एखाद्या काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवा. गरज वाटली तर वरतून पुन्हा थोडे तेल टाका आणि ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या. जशी लागेल तशी ही पेस्ट काढून वापरा. पण दरवेळी त्याला ओला हात किंवा ओला चमचा लागणार नाही याची काळजी घ्या. महिनाभर तरी तिला काहीच होणार नाही. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.