Join us  

रोजच्या स्वयंपाकासाठी 'ही' ग्रेव्ही आधीच बनवून ठेवा; कमी वेळात तयार होतील चविष्ट भाज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 7:17 PM

How to Make Gravy For Vegetables : प्रत्येक भाजीसाठी वापरता येईल असा मसाला, ग्रेव्ही आधीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवली तर रोजचं काम सोपं होऊ शकतं.

रोजच्या जेवणाला काय वेगळं बनवावं सुचत नाही.  त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊनही कंटाळा आलेला असतो. जर भाज्या बनवण्याची तयारी आधीच करून ठेवली असेल तर जास्त कष्ट न घेता पटापट स्वंयपाक तयार होतो. (How to Make Gravy For Vegetables) प्रत्येक भाजीसाठी वापरता येईल असा मसाला, ग्रेव्ही आधीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवली तर रोजचं काम सोपं होऊ शकतं. (How to make sabji masala)

ही ग्रेव्ही बनवण्याचं साहित्य

कांदे - ५

टोमॅटो - ८ 

आलं - २ tsp

लसूण कळ्या - २०

भोपळ्याच्या बीया-  २ tsp

तेल - ६-८ tsp

हळद - १/२ tsp

लाल तिखट - २ tsp

धने पूड - १ tsp

जिरेपुड- १ tsp

बडीशेप पूड - १/२ tsp

कृती

१) ही  ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात आधी टोमॅटोच्या बीया काढून फोडी करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतवून घ्या. त्यात चिरलेले लसूण, आलं, भोपळ्याच्या बीया घाला. 

२) टोमॅटो आणि मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करा. १० ते १५ मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरला लावून पारीक पेस्ट तयार करा.  

३) कढईत तेल गरम करून त्यात हळद, लाल तिखट, धणे जिरे पूड, बडीशेप पूड आणि वाटण घाला. हे मिश्रण तेल सुटेपर्यंत साधारण १५ मिनिटं शिजवून घ्या नंतर गॅस बंद करा.  तयार मिश्रण थंड झाल्यानंतर एका डब्ब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स