काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर, पत्ताकोबीची कोशिंबीर अशा वेगवेगळ्या कोशिंबिरी जेव्हा जेवणात असतात तेव्हा जेवणाची मजा वाढत जाते. एक वेळ भाजी- वरण यांना चव नसली, पण जेवणात जर मस्त चवीची कोशिंबीर असली तरीही मग अशावेळी जमून जातं.. काकडीची कोशिंबीर आपण तर नेहमीच करतो. आता तिच्यात थोडंसं वेगळेपण आणायचा प्रयत्न करूया. नेहमीच्याच रेसिपीला थोडासा ट्विस्ट देऊया आणि ग्रीक कुकुंबर रायता कसं करायचं ते पाहूया. ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Chef Kunal Kapoor) यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. (Greek cucumber raita recipe)
ग्रीक कुकुंबर रायता रेसिपीसाहित्य २ मध्यम आकाराच्या काकड्या
अर्धी वाटी दही
१ टीस्पून चाट मसाला
जास्त मेकअप केला तर आई खूप रागावते! पलक तिवारी सांगतेय, आईच्या शिस्तीचा धाक...
१ टीस्पून काळं मीठ
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टीस्पून किसलेलं आलं
२ टेबलस्पून बारीक चिरलेला पुदिना
चवीनुसार मीठ
चिमूटभर साखर
कृती १. सगळ्यात आधी बारीक चिरलेला लसूण आणि किसलेलं आलं अर्धी वाटी पाण्यात भिजत ठेवा.
२. काकडीची साले काढून घ्या आणि त्याचे बारीक काप करा.
केस खूपच चिकट झाले? करा १ सोपा उपाय- केस होतील सिल्की आणि चमकदार
३. आता एका मोठ्या भांड्यात दही घ्या. दह्यामध्ये चाट मसाला, काळ मीठ, थोडीशी साखर टाका आणि दही व्यवस्थित फेटून घ्या.
४. त्यामध्ये आता बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला पुदिना आणि आलं- लसूण भिजत टाकलं होतं ते पाणी घाला.
फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी
५. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर टाकली की सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. ग्रीक कुकुंबर रायता झाला तयार. जेवणाचा मेन्यू कोणताही असला तरी हे रायतं त्यासोबत अगदी सहज चालून जाईल...