Lokmat Sakhi >Food > विकतपेक्षा भारी ग्रीन चिली सॉस करा घरीच, शेफ कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी

विकतपेक्षा भारी ग्रीन चिली सॉस करा घरीच, शेफ कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी

Food And Recipe: ग्रीन चिली सॉस घरी कसा तयार करायचा, याची एक सोपी रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.(How to make green chilli sauce at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2024 12:07 PM2024-01-06T12:07:37+5:302024-01-06T14:59:39+5:30

Food And Recipe: ग्रीन चिली सॉस घरी कसा तयार करायचा, याची एक सोपी रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.(How to make green chilli sauce at home)

How to make green chilli sauce at home, Green chilli sauce recipe by celebrity chef kunal kapoor, Green chilli sauce recipe in marathi | विकतपेक्षा भारी ग्रीन चिली सॉस करा घरीच, शेफ कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी

विकतपेक्षा भारी ग्रीन चिली सॉस करा घरीच, शेफ कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी

Highlightsविकतच्या सॉसपेक्षा अधिक चवदार आणि जास्त हेल्दी असणारा ग्रीन चिली सॉस एकदा घरी करून बघाच...

नूडल्स, राईस अशा वेगवेगळ्या चायनिज पदार्थांमध्ये आपण हमखास ग्रीन चिली सॉस वापरतो. कारण त्याशिवाय त्या पदार्थांना एक मस्त झणझणीत फ्लेवर येत नाही. त्याचबरोबर पकोडे, भजी, कटलेट्स यांच्यासोबत खायलाही ग्रीन चिली सॉस लागतोच. अनेकदा तर पराठ्यांसोबतही हा सॉस खाल्ला जातो. आता हा सॉस वारंवार विकत आणण्यापेक्षा घरीच कसा तयार करायचा ते पाहूया (How to make green chilli sauce at home)... सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ग्रीन चिली सॉसची एक सोपी रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे (Green chilli sauce recipe by celebrity chef kunal kapoor). विकतच्या सॉसपेक्षा अधिक चवदार आणि जास्त हेल्दी असणारा ग्रीन चिली सॉस एकदा घरी करून बघाच...(Green chilli sauce recipe in marathi)

ग्रीन चिली सॉस रेसिपी 

 

साहित्य

दिड लीटर पाणी

१ कप व्हाईट व्हिनेगर

१ कप बटाट्याच्या फोडी

केस गळणं कमी करणारा सोपा उपाय, केस होतील घनदाट- वाढतील भराभर, करून पाहा

चवीनुसार मीठ

२ टेबलस्पून धने

२ टेबलस्पून साखर

१० ते १२ लसूण पाकळ्या 

१ इंच आल्याचा तुकडा

२०० ग्रॅम हिरव्या मिरच्या

 

कृती

१. सगळ्यात आधी तर एका कढईमध्ये पाणी आणि व्हिनेगर एकत्र करा आणि गरम करायला ठेवा.

उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स लक्षात ठेवा- परफेक्ट जमेल उपमा

२. पाणी आणि व्हिनेगर गरम झालं की त्यात लसूण, धणे, आलं, साखर, मीठ टाका आणि हे मिश्रण आणखी गरम होऊ द्या.

३. मिश्रणाला उकळी येऊ लागली की बटाट्याची सालं काढून त्याचे बारीक काप करून घ्यावेत आणि मग ते पाण्यात टाकावेत. 

 

४. यानंतर कढईवर झाकण ठेवून द्या आणि बटाटा शिजू द्या.

बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची 'ही' बघा एकदम वेगळी पद्धत- हिरव्यागार चेंडूंनी फुलून जाईल बाग

५. बटाटा शिजत आला की त्यात मिरच्यांचे तुकडे टाका. मिरच्या शिजल्या आणि त्यांचा रंग बदलला की गॅस बंद करा.

६. मिश्रण थंड झालं की ते मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट नंतर कढईमध्ये टाका आणि तिला एक उकळी देऊन घ्या. हा झाला आपला होममेड ग्रीन चिली सॉस. थंड झाल्यावर हा सॉस एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.

 

Web Title: How to make green chilli sauce at home, Green chilli sauce recipe by celebrity chef kunal kapoor, Green chilli sauce recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.