जेवताना तोंडी लावणीसाठी ठेचा, लोणचं असलं की जेवणाची मजाच काही वेगळी. ठेचा बनवण्यासाठी लाल किंवा हिरव्या कोणत्याही मिरच्यांचा वापर करू शकता. (Mirchicha Thecha Recipe) ठेचा बनवण्याची परफेक्ट पद्धत सर्वांनाच माहीत नसते. पूर्वी पाटा वरंवट्यांवर मिरच्या वाटल्या जायच्या आणि मिक्सरचा वापर करून सर्व पदार्थ दळून घ्या. ठेचा करण्याची पारंपरीक रेसेपी या व्हिडिओत पाहूया. तांदळाची भाकरी किंवा चपातीबरोबर हा ठेचा ट्राय करू शकता. (How to make mirchicha thecha)
साहित्य
8 ते १० हिरव्या मिरच्या
4-5 लसूण पाकळ्या
1/2 जीरे
2 टेबलस्पून चिरलेली कोथींबीर
मीठ
कृती
१) सगळ्यात आधी तव्यावर थोडे तेल घालून मिरच्या छान भाजून घ्या.भाजल्यावर थोड्या थंड होऊ द्याव्या.
२) खलबत्त्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या मिरच्या वाटून घ्या. त्यात लसूण पाकळ्या, नंतर भारलेल्या मिरच्या व जीरं घाला. जाडसर वाटून घ्या. त्यात मीठ व कोथींबीर घालून परत थोडे वाटून घ्यावे.
३) मिरच्या बारीक करू नका, दगडी खलबत्तामध्ये ठेचा छान होतो. तयार आहे झणझणीत ठेचा.