अनेकांच्या शाळा सुरु झाल्या. मुलांना शाळेत जाण्यासाठी आई वडील त्यांना रेडी करतात (Thalipeeth). त्यांना टिफिन देतात, त्यांची बॅग रेडी करतात. मुलं जेव्हा शाळेत जातात, तेव्हा पालकांना त्यांचं मुल जेवणाचा डब्बा संपवून येतो की नाही, याचे टेन्शन असते. कारण टिफिनमध्ये आवडीचा पदार्थ नसेल तर, मुलं खाणं टाळतात (Cooking Tips). त्यामुळे मुलं टिफिन संपवतील, असा कोणता पदार्थ मुलांना बनवून द्यावा? असा प्रश्न पालकांना पडतो (Food).
जर रोजचे पदार्थ आणि भाजी पोळी खाऊन मुलांना कंटाळा आला असेल तर, त्यांना मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ करून खायला द्या (Kitchen Tips). मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतेच, शिवाय हा चविष्ट पदार्थ खाल्ल्याने पोट देखील भरते(How to make green moong thalipeeth, check out tiffin recipe for kid).
मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य
मोड आलेले मूग
लसूण
हिरवी मिरची
कोथिंबीर
मीठ
धणे पूड
पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..
ओवा
हळद
पांढरे तीळ
गव्हाचं पीठ
ज्वारीचं पीठ
बेसन
तांदुळाचं पीठ
तेल
कृती
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी मोड आलेले मूग घ्या. त्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, २ ते ३ हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.
त्यात एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धणे पूड, ओवा, हळद, अर्धा चमचा पांढरे तीळ घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा गहू, ज्वारी, बेसन आणि तांदुळाचं पीठ घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपलं थाळीपीठचं बॅटर रेडी.
पिंपल्स - मुरुमांचे डाग जात जाता नाही? पाण्यात ‘या’ छोट्याश्या बिया घालून प्या- स्किन करेल ग्लो
आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. पोळपाट घ्या, त्यावर ओला सुती कापड पसरवा. त्यावर मिश्रण ठेवा, आणि हाताने थापून पसरवा. मधोमध छिद्र पाडा, आणि पांढरे तीळ लावा.
तव्याला ब्रशने तूप किंवा तेल लावा. कापड अलगद उचलून, तव्यावर थालीपीठ पसरवा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ खाण्यासाठी रेडी. आपण हे थालीपीठ दह्यासोबत देखील खाऊ शकता.