चटपटीत चटणी म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटत. आपण भजी, वडे, चाट पदार्थ किंवा इतर तळणीचे पदार्थ चटणीसोबत खाणे पसंत करतो. खरंतर, चटणी ही साईड डिश प्रकारात जरी मोडत असली तरी पदार्थांची खरी चव वाढवण्यासाठी ती आवश्यक असते. चटपटीत, चमचमीत पदार्थांची चव आणखीनच वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून आवडीने खातो. सामोस्यासोबत हिरवी चटणी, पाणीपुरी सोबत खजुराची चटणी, वडापाव सोबत लसूण चटणी असे चटणीचे असंख्य प्रकार असतात. ओली व सुकी अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या आपण विविध पदार्थांसोबत खातो.
चटणी हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. चवदार चटण्या या भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. केवळ अन्नपदार्थांची चव वाढावी म्हणून चटण्यांचे सेवन केले जात नाही तर काही चटण्या खाणे या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या असतात. कोथिंबीर-पुदिन्यापासून ते वेगवेगळ्या डाळींपर्यंत अशा कित्येक प्रकारच्या चटणी तयार केल्या जातात. चटणीमुळे जेवणाची चव वाढतेच. सोबत आपल्याला कित्येक आरोग्यदायी फायदे देखील मिळतात. शेफ कुणाल सांगतोय, पेरूची झटपट होणारी चटणी कशी करायची. साहित्य कृती पाहून घेऊयात. शेफ कुणाल हे नेहमी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडीओ शेअर करत असतात. पेरूची आंबट - गोड चटणी घरच्या घरी कशी बनवायची हे त्यांनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओमधून समजून घेऊयात(How To Make Guava Chutney At Home (Amrood Ki Chutney).
साहित्य :-
१. पेरू - ३ (मध्यम पिकलेले)
२. तेल - २ ते ३ टेबलस्पून
३. पुदिन्याची पाने - १ कप
४. आलं - १ इंचाचा छोटा तुकडा
५. हिरव्या मिरच्या - २ ते ३
६. काळं मीठ - ३/४ टेबलस्पून
७. लिंबाचा रस - ३ टेबलस्पून
८. चाट मसाला - २ टेबलस्पून
९. जिरे - २ टेबलस्पून
१०. पाणी - १ कप
अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...
कृती :-
१. सर्वप्रथम पेरू घेऊन त्यावर २ ते ३ टेबलस्पून तेल घालून हातांनी तेल संपूर्ण पेरुला लावून घ्यावे.
२. आता गॅसवर एक जाळी ठेवून त्यावर हे पेरु ठेवून सर्व बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत.
३. पेरू संपूर्ण भाजून झाल्यानंतर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यावेत मग त्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे पेरु तसेच झाकून ठेवावेत.
४. त्यानंतर त्या बाऊलवरचे झाकण काढल्यावर हातांनी पेरूची भाजलेली साल कुस्करून काढून घ्यावी.
५. पेरुची भाजलेली सालं काढून घेतल्यानंतर या भाजलेल्या पेरूचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
६. आता हे पेरूचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात पुदिना, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, काळ मीठ, लिंबाचा रस, पाणी, जिरे घालावे. हे सगळे जिन्नस एकत्रित होण्यासाठी आता त्यात गरजेनुसार पाणी घालावे.
७. हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये पातळ वाटून घ्यावेत.
८. आता ही मिक्सरमधली पेरुची तयार झालेली चटणी गाळणीने गाळून घ्यावी.
ताज्या करकरीत कैरीची करा ‘फोडणीची कैरी’; तोंडी लावायला झटपट पदार्थ- उन्हाळा होईल सुसह्य...
आता आपली पेरुची चटणी खाण्यासाठी तयार आहे.