Join us  

एक थेंब ही तेल न वापरता फाफडा करता येतो ? पाहा, बिनतेलाची कुरकुरीत फाफडा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 12:32 PM

Gujarati Fafda : Instant Crispy less oily fafda recipe : गुजरातचा स्पेशल फाफडा आता बनवा घरीच... तेलाचा वापर न करताही फाफडा होईल तितकाच कुरकुरीत, चविष्ट...

मूळची गुजराथी डिश असलेला फाफडा देशभर प्रसिद्ध आहे. फाफडा (Fafda) हा खाद्यपदार्थ जरी गुजरात राज्यातला असला तरी आता अनेक ठिकाणी आवडीने खाल्ला जातो. फाफडा हा चण्याच्या पिठापासून बनवलेला कुरकुरीत, तळलेला नाश्त्याचा प्रकार आहे. आपल्याकडे बरेचदा रोजच्या त्याच त्याच नाश्त्याचा कंटाळा आला की, आपण काहीतरी वेगळे नक्की खातो. आपल्यापैकी बरेचजण सकाळच्या नाश्त्याला जिलेबी, फाफडा, ढोकळा असे पदार्थ खाणे पसंत करतात. कुरकुरीत मसालेदार फाफड्याचा एक तुकडा खाऊन त्यावर गोड जिलेबीचा एक घास खाणे, याहून मोठे स्वर्गसुख नाही. फाफडा हा पारंपरिक पद्धतीने तळलेली मिरची किंवा कोरड्या पपईच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह केला जातो.  

बेसन पिठापासून तयार केलेला हा फाफडा तेलात तळला जातो. तेलात तळल्यामुळे हा फाफडा अतिशय तेलकट होतो. आजकाल सगळेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे कमी तेलकट पदार्थ खाणे पसंत करतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर असा तेलकट पदार्थ खाणे योग्य नाही. अशावेळी आपण आपल्या आरोग्याचा विचार करून बेक्ड पदार्थ खाण्यावर अधिक भर देतो. फाफडा (Fafda Recipe - How To Make Fafda) बनवताना आपण घरच्या घरी अगदी एक थेंबही  तेल न वापरता झटपट तितकाच कुरकुरीत व चविष्ट फाफडा बनवू शकतो(How To Make Gujarati Non-Fried Healthy Fafda).     

साहित्य :- 

१. बेसन - १ कप २. पापड खार - १/२ टेबलस्पून ३. बेकिंग पावडर - १/४ टेबलस्पून ४. हळद - १/४ टेबलस्पून ५. पाणी - २ टेबलस्पून ६. ओवा - १/२ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार ८. हिंग - १/८ टेबलस्पून 

उरलेला पिझ्झा परत गरम करुन खाण्याची १ सोपी भन्नाट ट्रिक ! पिझ्झा टॉपिंग, सॉसची चव लागेल एकदम फ्रेश...

मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

कृती :- 

१. सर्वप्रथम एक कप बेसन घेऊन ते चाळणीत ओतून बारीक चाळून घ्यावे. २. आता एका छोट्या बाऊलमध्ये पापड खार, बेकिंग पावडर, हळद घेऊन त्यात थोडेसे पाणी ओतून हे सगळे जिन्नस पाण्यासोबत मिसळून घ्यावे. ३. त्यानंतर बारीक चाळून घेतलेल्या बेसन पिठामध्ये ओवा, हिंग, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. ४. आता मगाशी तयार करून घेतलेले पाणी हळूहळू यात ओतून पीठ मळून घ्यावे. पीठ मळताना ते जास्त घट्ट किंवा अगदीच पातळ मळू नये. ५. पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे - छोटे चपटे लंबगोलाकार आकारात गोळे करुन घ्यावेत. 

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!

पेरी -पेरी मखाणा मिक्स - सायंकाळी खा, वजनही वाढणार नाही आणि चटकमटक खाताही येईल !

६. आता एक लाकडी चॉपिंग बोर्ड घेऊन एक - एक गोळा घेऊन आपल्या तळहाताच्या मनगटाच्या बाजूने त्याच्यावर दाब देऊन तो पसरवत फाफड्याच्या आकारात लांब करून घ्यावा. ७. त्यानंतर चॉपिंग बोर्डवर चिकटलेला हा फाफडा सुरीच्या मदतीने काढून घ्यावा. ८. आता या फाफड्याच्या दोन्ही बाजूस थोडे तेल लावून एका डिशमध्ये अशाप्रकारे फाफडा तयार करून घ्यावा. ९. त्यानंतर १ मिनिटांसाठी ही डिश मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवून, फाफडा चांगला बेक करून घ्यावा. 

तेलात न तळलेला परंतु तितकाच चविष्ट असा बेक्ड केलेला फाफडा खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती