सण समारंभाला किंवा रोजच्या खाण्यात काही गोड खावसं वाटतं तर काय खायचं असा प्रश्न पडतो. नेहमी नेहमी बाहेरून मिठाई आणणं शक्य नसतं. (Cooking Hacks) अगदी कमीत कमी साहित्यात तुम्ही घरीच मिठाई बनवू शकता. नैवेद्यासाठीही तुम्ही ही मिठाई ठेवू शकता. (How to Make Milk Mithai)
१) दूध बर्फी बनवण्यासाठी प्रथम एका जड पॅनमध्ये दूध घाला आणि उकळण्यासाठी ठेवा. प्रथम दूध मोठ्या आचेवर उकळवा, नंतर गॅस मंद करा आणि दूध घट्ट होऊ द्या.
२) दूध एका मोठ्या चमच्याने खालून ढवळत राहा जेणेकरून ते तळाशी जळू नये. दूध घट्ट होईपर्यंत चांगले शिजवून घ्या आणि दूध घट्ट होऊ लागल्यावर त्यात मिल्क पावडर घाला.
३) दुधाची पावडर घातल्याने दूध लगेच घट्ट होऊ लागते आणि त्याची बर्फीही खूप चवदार बनते. दूध पूर्ण घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला आणि दूध ढवळत असताना साखर मिसळा.
४) दुध कढईतून वेगळे होईपर्यंत घट्ट करावे लागेल. कंडेन्स्ड मिल्क १ ते २ चमचे त्यात घाला.
५) गॅसची आच बंद करून एका मोठ्या थाळीत तूप लावून सर्वत्र पसरवा. आता तूप लावलेल्या प्लेटमध्ये कंडेन्स्ड मिल्क पसरवा आणि त्यावर पिस्ते टाका.
६) आता सेट होण्यासाठी 15 मिनिटे ठेवा. १५ मिनिटांनंतर बर्फीच्या आकारात कापून प्लेटमधून बाहेर काढा. मस्त मिल्क बर्फी तयार आहे. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्याही घालू शकता.