हिवाळा म्हणजे खवय्यांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी असते. कारण या दिवसांत फळं, भाज्या भरपूर प्रमाणात येतात आणि शिवाय ते इतर कोणत्याही ऋतूपेक्षा जास्त फ्रेश असतात. हिवाळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवसांत जेवण छान जातं, अन्नपचन व्यवस्थित होतं. त्यामुळे खाओ आणि खिलाओ असा हा ऋतू आहे. हिवाळ्याच्या दिवसांत कोवळा हरबरा बाजारात भरपूर प्रमाणात येतो. त्यालाच काही भागात हरियालबूट किंवा टहाळ असं सुद्धा म्हणतात. त्याची खूप छान आमटी करता येते. कधी एखाद्या दिवशी भाजीच्याऐवजी ही आमटी करून पाहा (How to make harbara amti?). चव एवढी भारी होईल की एखादी पोळी नक्कीच जास्त खाल...(simple and easy recipe of making harbara amti)
हरबऱ्याची आमटी करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी हिरवेगार, कोवळे हरबरे
८ ते १० लसूण पाकळ्या
२ ते ३ हिरव्या मिरच्या
मोत्याच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स- नव्या नवरीसाठी नवी फॅशन, घ्या काहीतरी वेगळं- एकदम युनिक
अर्धा इंच आल्याचा तुकडा
१ टीस्पून जिरे
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग
चवीनुसार मीठ
कृती
१. सगळ्यात आधी कढईमध्ये थोडं तेल टाका आणि त्या तेलामध्ये हरबरे परतून घ्या.
२. हरबरे परतून झाले की ते कढईतून बाहेर काढा आणि मग कढईमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं टाकून परतून घ्या.
सकाळी उठल्यावर लगेच 'हे' काम करा! तब्येत राहील ठणठणीत, वजनही राहील आटोक्यात
३. परतून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाले की मग ते सगळे एकत्र मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्यात थोडे जिरे टाकून छान बारीक वाटण करून घ्या.
४. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तेल, मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्या.
१ मिनिटात डासांना पळवून लावायचंय? करा 'हा' सोपा उपाय, डास होतील गायब आणि घर सुगंधी..
५. फोडणी झाल्यानंतर मिक्सरमधलं वाटण कढईमध्ये घाला आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या.
६. वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात गरम पाणी घाला. आमटी खूप पातळ तसेच खूप घट्ट करू नका. चवीनुसार मीठ घालून ५ ते १० मिनिटे चांगली उकळी येऊ द्या. गरमागरम झणझणीत अशी हरबऱ्याची आमटी तयार..