कुठल्याही रेटॉरंटमध्ये गेल्यावर जेवणाच्या आधीची स्टार्टर डिश म्हणून पनीरलाच पसंती दिली जाते. स्टार्टर डिश मधील पनीर म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. पनीरचे असंख्य पदार्थ बनवले जातात. जेवणामध्ये स्टार्टर पासून ते मेन कोर्सपर्यंत सगळ्याच गोष्टीत पनीरचा वापर केला जातो. चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो. पनीरचे स्टार्टर खाण्यात मज्जा काही औरच असते.
पनीर ६५, पनीर चिली, पनीर कोफ्ता, पनीर लाबाबदार, पनीर टिक्का असे पनीरचे अनेक प्रकार स्टार्टरमध्ये नक्कीच खाल्ले असतील. पनीर हा एक असा पदार्थ आहे की त्याला कोणत्याही मसाल्यांमध्ये घोळवले की तो त्याची चव घेऊन अधिक स्वादिष्ट लागतो. आपल्या घरी काही खास प्रसंग, सण, समारंभ असला की आपण हमखास पनीरचे अनेक पदार्थ जेवणात बनवतोच. स्टार्टरमध्ये आपण पनीरचे वेगवेगळे पदार्थ घरच्या घरी बनवू शकतो. हरियाली पनीर हा त्यापैकीच एक खास पदार्थ आहे. आता आपण घरच्या घरी देखील पनीरचे झटपट होणारे स्टार्टर बनवू शकतो. हरियाली पनीर स्टार्टर बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make 'Hariyali Paneer' In Just 15 Minutes At Home, Easy Starter Recipe).
साहित्य :-
१. कोथिंबीर - १ कप २. पुदिना - १ कप ३. लसूण - ६ ते ७ पाकळ्या ४. आलं - छोटा तुकडा ५. हिरवी मिरची - ५ ते ६६. मीठ - चवीनुसार ७. दही - १ कप ८. पनीर - २०० ते ३०० ग्रॅम ९. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम, एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, लसूण, आल्याचा छोटा तुकडा, हिरवी मिरची, मीठ, दही हे सर्व घालून ते मिश्रण पातळसर वाटून घ्यावे. २. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून काढून मोठ्या बाऊलमध्ये ओतून घ्यावे. ३. पनीरचे चौकोनी लहान तुकडे करून घ्यावेत.
ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...
४. आता या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या पातळसर मिश्रणात पनीरचे लहान तुकडे बुडवून घ्यावेत. किमान १५ ते २० मिनिटे पनीरचे तुकडे या मिश्रणात बुडवून ठेवावे. ५. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल किंवा आपल्या आवडीनुसार बटर घालून घ्यावे.६. आता कोथिंबीर, पुदिन्याच्या पेस्टमध्ये मॅरीनेट करून घेतलेले पनीरचे तुकडे एक एक करून तेलावर अलगद सोडावे. ७. हे पनीरचे तुकडे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत.
सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...
पनीर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून झाल्यानंतर गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करावे.