Join us  

हा घ्या ताकदीचा सुपरडोस; १५ मिनिटांत करा मखाण्याचा उत्तपा- नाश्ता हेल्दी, पुरेल दिवसभर एनर्जी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 7:34 PM

Healthy Makhana Uttapam : आता भूक लागली म्हणून नुसतेच मखाणे खाण्यापेक्षा करा झटपट मखाण्याचा टेस्टी उत्तपा

सकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा असे पदार्थ अगदी आवडीने खाल्ले जातात. त्यातही उत्तपा हा सगळ्यांच्या विशेष आवडीचा पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारची पिठं, आवडीच्या भाज्या वापरुन आपण हा नेहमीचा उत्तपा हेल्दी बनवू शकतो. उत्तप्याचे अनेक प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच माखणा उत्तपा हा एक प्रकार. माखण्यांपासून तयार केलेला उत्तपा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो(Healthy Makhana Uttapam).

माखण्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. मखाणे खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त ठरते. हेल्दी मखाणा उत्तपा नाश्त्यात किंवा दिवसभरात हलकी भूक लागल्यास तयार करून खाऊ शकतो. हा अतिशय टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय होऊ शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या अगदी कमी साहित्यात हा उत्तपा झटपट तयार करता येऊ शकतो. हा चविष्ट, पौष्टिक मखाणा उत्तपा करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Healthy Makhana Uttapam At Home).

साहित्य :- 

१. मखाणे - १/२ कप २. पोहे - १/२ कप ३. बारीक रवा - १/२ कप ४. दही - १/२ कप ५. पाणी - गरजेनुसार ६. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)७. आलं - छोटा तुकडा (बारीक किसून घेतलेला)८. मीठ - चवीनुसार ९. फ्रुट सॉल्ट - चिमुटभर १०. चीज - १ क्यूब ११. तूप / तेल - २ ते ३ टेबलस्पून १२. ढोबळी मिरची - १/२ कप १३. मक्याचे दाणे - १/२ कप १४. टोमॅटो - १/२ कप १५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

मुसळधार पावसात खा गरमागरम मक्याचे आप्पे, झटपट होणारी खमंग, क्रिस्पी सोपी रेसिपी... 

पावसाळ्यात भाज्या नीट धुतल्या  नाहीतर पडाल आजारी, भाज्या धुण्याची सोपी पद्धत... 

कृती :- 

१. सगळ्यातआधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात मखाणे, पोहे, बारीक रवा, दही व गरजेनुसार पाणी घालून हे सगळे जिन्नस २० ते २५ मिनिटे भिजत ठेवावेत. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या व आल्याचा लहान तुकडा आणि मीठ घालावे, आता हे सगळे जिन्नस मिक्सरमधून वाटून घेऊन त्याचे मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करुन घ्यावे.  

२. या तयार बॅटरमध्ये इनो फ्रुट सॉल्ट घालून बॅटर व्यवस्थित चमच्याने हलवून एकजीव करुन घ्यावे. आता एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, मक्याचे दाणे घालून ते मिक्स करुन घ्यावे. 

३. आता गरम तव्याला तेल किंवा तूप लावून त्यावर हे तयार बॅटर गोलाकार आकारात पसरवून त्याचे उत्तप्पे तयार करुन घ्यावेत. त्यानंतर यावर सगळ्या भाज्यांचे मिश्रण पसरवून घ्यावे. वरून हवे असल्यास चीज किसून घालावे. उत्तप्प्याच्या कडांना तेल सोडून हे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत. 

मखाणा उत्तपा खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हा हेल्दी मखाणा उत्तप्पा खाण्यासाठी सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती