Join us  

साखर- गूळ न वापरता करा बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी १० मिनिटांत हाय प्रोटीन पौष्टिक मोदक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 5:28 PM

How To Make High Protein Rich Healthy Modak : healthy modak recipes for sugar-free celebrations : Healthy Modak : आता घरच्याघरी झटपट तयार होणारे हाय प्रोटीन रिच हेल्दी मोदक करा झटपट...

गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार केले जातात. गणपती बाप्पांचा नैवेद्य हा मोडकांशिवाय अपूर्णच आहे. गणरायाला मोदक फार आवडतात. गणपतीच्या दहा दिवसांत आपण बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतो. या मोदकांमध्ये आपण तळणीचे, उकडीचे असे अनेक प्रकारचे मोदक (Sugar Free Modak) तयार करतो. 'मोदक' नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत. घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मोदक हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे(healthy modak recipes for sugar-free celebrations).

गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत आपण असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खातो. या उत्सवादरम्यान मोदकांसोबतच (Must Try These Healthy Modak Recipes) आपण इतरही गोडधोडाचे पदार्थ अगदी आवडीने खातो. या दहा दिवसात आपले बरचे गोडधोड खाणे होते. जास्त गोड खाणे आपल्या शरीराला हानिकारक ठरु शकते. यासाठीच आपण घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून बाप्पाच्या प्रसादासाठी हेल्दी मोदक (Protein And Iron Rich Modak) तयार करु शकतो. हे मोदक तयार करण्यासाठी फारसा घाट न घालता अगदी झटपट होणारे सोपे मोदक आहेत. हे हाय प्रोटीन रिच हेल्दी मोदक (Healthy Modak) तयार करण्यासाठी खूप मोठा घाट घालावा लागत नाही. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण हे हेल्दी मोदक घरच्या घरी झटपट तयार करु शकतो. हाय प्रोटीन रिच मोदक तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make High Protein Rich Healthy Modak).

साहित्य :- 

१. तूप - २ ते ३ टेबलस्पून २. पनीर - १ कप ३. मिल्क पावडर - १/२ कप ४. वेलची पूड - १/२ टेबलस्पून ५. दूध - ४ ते ५ टेबलस्पून ६. केसर - ५ ते ६ काड्या ७. बदाम पावडर - १/२ कप (भाजून घेतलेल्या बदामाची पावडर)८. ड्राय जर्दाळूचा किस - २ टेबलस्पून ९. ड्रायफ्रुटस काप - ३ ते ४ टेबलस्पून १०. सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या - १ टेबलस्पून ११. डेसिकेटेड कोकोनट - १ कप १२. काजू पावडर - १/२ कप १३. ड्राय जर्दाळू पावडर - २ टेबलस्पून १४. गुलाबाच्या पाकळ्या - १ टेबलस्पून  

वाटी- चमच्याने द्या मोदकाला  परफेक्ट आकार! नाजूक - सुबक होतील मोदक - पाहा भन्नाट आयडिया...

मोदकाचे सारण सैल झाले किंवा कडक झाले तर? पाहा सारणाची परफेक्ट कृती- मोदक फसणारच नाहीत... कृती :- 

१. एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यात किसलेले पनीर, मिल्क पावडर, वेलची पूड, दुधात भिजवलेले केसर घालून सगळे जिन्नस २ ते ३ मिनिटे परतून घ्यावे. २. त्यानंतर हे मिश्रण थोडे कोमट गरम असताना एका डिशमध्ये काढून व्यवस्थित चमच्याने पसरवून घ्यावे. त्यानंतर त्यावर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या काजू - बदामाचे बारीक काप पसरुन घालावेत.३. आता या मोदकाचे सारण तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये ड्राय जर्दाळूचा किस, डेसिकेटेड कोकोनट, बदाम पावडर, काजू पावडर, वेलची पूड घालून हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्स करून त्याचे सारण तयार करून घ्यावे.  

तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी...

४. आता मोदकाच्या साच्याला आतून थोडेसे तूप लावून घ्यावे. तूप लावल्यानंतर त्यात केसर, काजू - बदाम, पिस्त्याचे काप घालावेत. ५. त्यानंतर पनीरचे तयार केलेले सारण आत दाबून त्याला मोदकाचा आकार देऊन मोदकाची पारी तयार करून घ्यावी. मोदकाची पारी केल्यानंतर त्यात तयार करून घेतलेले सारण घालावे. ६. सारण घातल्यावर सगळ्यात शेवटी थोडेसे पनीर घेऊन मोदकाच्या तळाची पारी तयार करुन घ्यावी. ७. मोदक साच्यातून काढून घ्यावे आणि त्यावर दुधात भिजवलेले केसर घालावे. 

हाय प्रोटीन रिच मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृतीगणेश चतुर्थी रेसिपी