भारतीय पदार्थांमध्ये मसाले महत्वाची भूमिका बजावतात (Garam Masala). मसाल्यामुळे पदार्थाची चव वाढते. तिखट मसाला, गरम मसाला, जिरे पूड, आमचूर पावडर, यासह विविध प्रकारचे मसाले बाजारात उपलब्ध आहे (Cooking Tips). पण बाजारातील मसाल्यांमध्ये केमिकल रसायने असतात. जे शरीरासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे विकतचे मसाले आणण्यापेक्षा आपण घरातच मसाले तयार करू शकता.
गरम मसाला प्रत्येक पदार्थात वापरण्यात येतो. यामुळे पदार्थाची चव वाढते. जर आपल्याला घरीच गरम मसाला तयार करायचा असेल तर, आपण या पद्धतीने गरम मसाला तयार करू शकता. घरच्या खडा मसाल्याचा वापर करून गरम मसाला झटपट तयार होतो(how to make homemade garam masala spice mix powder).
लागणारं साहित्य
धणे
जिरे
काळी मिरी
केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त
गदा फूल
दगडफूल
चक्रफूल
हळकुंड
वेलची
जायफळ
दालचिनी
सुकी लाल काश्मिरी
खसखस
तमालपत्र
बडीशेप
सैंधव मीठ
हिंग
कसुरी मेथी
कृती
सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात एक कप धणे घाला. नंतर त्यात एक टेबलस्पून जिरे, काळे जिरे, एक टेबलस्पून काळी मिरी, ५ ते ६ लवंगा, एक गदा फूल, एक दगडफूल, एक चक्रफूल, २ इंच हळकुंड, ६ ते ७ वेलची, एक जायफळ, ३ इंच दालचिनी, ३ सुकी काश्मिरी लाल मिरची, अर्धा टेबलस्पून खसखस, २ तमालपत्र, अर्धा चमचा बडीशेप, एक टेबलस्पून सैंधव मीठ आणि चिमुटभर हिंग घालून मिक्स करा.
कंगवा फिरवताच फरशीवर केसच केस? 'या' भाजीच्या रसाचा करा वापर; पांढरे केसही होतील गायब
७ ते ८ मिनिटांसाठी मध्यम आचेवर सगळे मसाले भाजून घ्या. मसाले भाजून घेतल्यानंतर थोडं थंड करण्यासाठी ठेवा. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले मसाले घालून बारीक करून घ्या. नंतर त्यात एक चमचा कसुरी मेथी घालून बारीक करा. अशा प्रकारे घरगुती गरम मसाला वापरण्यासाठी रेडी.