'नाचोस' हा एक मेक्सिकन पाककृतीचाअतिशय लोकप्रिय प्रकार आहे. हा पदार्थ जरी मेक्सिकन असला तरीही त्याची चव संपूर्ण देशभर पसरली आहे. भारतात देखील हे नाचोस तितक्याच आवडीने खाल्ले जातात. आपण कुठल्याही मोठ्या रेस्टोरंट किंवा कॅफेमध्ये गेलो की हमखास नाचोस ऑर्डर करतोच. लहान मुलांना नाचोस विशेष प्रिय आहेत. घरातील कुठलेही फंक्शन किंवा बर्थडे पार्टी अशावेळी लहान मुलांमध्ये नाचोसची क्रेझ फारच बघायला मिळते. मस्त मसालेदार, कुरकुरीत, खुसखुशीत नाचोस चीझी डिप सोबत खाण्याची मज्जा काही औरच असते.
चटपटीत, मस्त मसालेदार नाचोस खाणे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. आपण सहसा बाहेर कुठल्याही मोठ्या रेस्टोरंट किंवा कॅफेमध्ये गेलो की नाचोस आवडीने खातोच. परंतु हे नाचोस आपण घरच्या घरी देखील झटपट तयार करू शकतो. बाहेर विकतचे नाचोस खाण्यापेक्षा आपण घरीच चटकन अगदी कमी साहित्यात नाचोस बनवू शकतो. याचबरोबर आपण घरातील लहान मुलांच्या सुक्या खाऊच्या टिफिनमध्ये देखील नाचोस देऊ शकतो. त्यामुळे आता बाहेर मोठ्या रेस्टोरंट किंवा कॅफेमध्ये जाऊन नाचोस खाण्यापेक्षा घरीच झटपट तयार होणाऱ्या नाचोसची सोपी कृती पाहूयात(How To Make Homemade Mexican Nacho Chips At Home With Simple 3 Ingredients).
साहित्य :-
१. मक्याचे पीठ - १ कप
२. गव्हाचे पीठ - १ कप
३. मीठ - चवीनुसार
४. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून
५. ऑरेगॅनो - १ टेबलस्पून
६. तेल - तळण्यासाठी
७. पाणी - गरजेनुसार
कृती :-
१. सर्वप्रथम, एका मोठ्या ताटात मक्याचे पीठ, गव्हाचे पीठ ओतून घ्यावे.
२. आता ही दोन्ही पीठ एकमेकांमध्ये मिसळून घ्यावीत.
३. या पिठामध्ये, चवीनुसार मीठ व आपल्या आवडीनुसार चिली फ्लेक्स,ऑरेगॅनो घालावेत.
४. त्यानंतर गरजेनुसार या पिठात पाणी घालून चपातीप्रमाणे पीठ मळून घ्यावे.
५. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर एक कपडा घालून पीठ २० ते २५ मिनिटे झाकून ठेवावे.
उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...
सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...
६. त्यानंतर या पिठाचे गोळे बनवून त्याच्या चपात्या गोलाकार आकारात लाटून घ्याव्यात.
७. या चपात्या गोलाकार लाटून घेतल्यानंतर सुरीने त्यावर छोटे छोटे टोचे मारून खाचा पाडून घ्याव्यात.
८. आता या गोलाकार चपातीच्या मध्यापासून ते काठापर्यंत त्रिकोणी असे काप पाडून घ्यावेत.
९. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे व त्यात हे नाचोस घालून तळून घ्यावेत.
मस्त मसालेदार, कुरकुरीत, खुसखुशीत नाचोस खाण्यासाठी तयार आहेत.