Join us  

कुडकुडणाऱ्या थंडीत प्या वाफाळतं हॉट चॉकलेट, बघा ५ मिनिटांत होणारी एकदम कॅफेस्टाईल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 3:58 PM

Simple And Quick Recipe Of Hot Chocolate: चहा, कॉफी यांच्याप्रमाणेच थंडीच्या दिवसांत हॉट चॉकलेट प्यायलाही अनेकांना आवडतं. म्हणूनच ही बघा झटपट हाॅट चॉकलेट तयार करण्याची अगदी सोपी रेसिपी. (cafe style hot chocolate recipe in marathi)

ठळक मुद्देरेसिपी अगदी सोपी आहे आणि शिवाय एकदम झटपट होणारी. त्यामुळे सध्याच्या कुडकुडणाऱ्या थंडीत वाफाळतं हॉट चॉकलेट पिऊन बघाच...

हॉट चॉकलेट हा तसा अगदी स्वस्तात होणारा गरमागरम पदार्थ. पण तेच प्यायला जर आपण एखाद्या कॅफेमध्ये गेलो, तर त्यासाठी आपल्याला अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. बरं एवढे पैसे देऊनही ते हॉट चॉकलेट आपल्या आवडीप्रमाणे मिळेलच याची काही खात्री नाही. म्हणूनच आता घरच्याघरी अगदी कॅफे स्टाईल हॉट चॉकलेट कसं करायचं ते पाहा (How to make hot chocolate?). या चॉकलेटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर आणि चॉकलेट टाकू शकता (Simple and quick recipe of Hot chocolate in just 5 minute). रेसिपी अगदी सोपी आहे आणि शिवाय एकदम झटपट होणारी. त्यामुळे सध्याच्या कुडकुडणाऱ्या थंडीत वाफाळतं हॉट चॉकलेट पिऊन बघाच...(hot chocolate recipe in marathi)

 

हॉट चॉकलेट रेसिपी 

ही रेसिपी madhurasrecipe या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

साहित्य

२ कप दूध

साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ४ खास टिप्स, बघा कशी नेसायची साडी....

आवडीनुसार दिड ते दोन टेबलस्पून साखर

१ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर

२ टेबलस्पून कोको पावडर

कितीही पुसल्या तरी फरशा स्वच्छ दिसत नाही? फक्त १ पदार्थ वापरा- लख्ख चमकतील फरशा

१ दालचिनीचा इंचभर तुकडा

२ टेबलस्पून डार्क चॉकलेट.

 

रेसिपी

१. सगळ्यात आधी तर थंड दुधात साखर, कोको पावडर आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घ्या. दुधात कॉर्नफ्लॉवरच्या तसेच कोको पावडरच्या गाठी होणार नाहीत, याकडे लक्ष द्या. 

२. यानंतर दालचिनीचा तुकडा टाकून दूध गॅसवर उकळायला ठेवा.

प्रवासात मळमळ- उलट्या होतात? ६ सोपे उपाय, मुळीच त्रास होणार नाही- सफर होईल सुहाना.. 

३. दुधाला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये डार्क चॉकलेट टाका. तुमच्या आवडीचं व्हाईट चॉकलेट टाकलं तरी चालेल.

४. यानंतर दूध छान उकळलं की गाळून घ्या. गरमागरम हॉट चॉकलेट तयार... 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.