Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी घरीही करता येईल, ते ही झटपट! बघा, रुमाली रोटी करण्याची सोपी रेसिपी

हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी घरीही करता येईल, ते ही झटपट! बघा, रुमाली रोटी करण्याची सोपी रेसिपी

Food and Recipe: हॉटेलसारखी मऊ, पातळ रुमाली रोटी ( Rumali Roti Recipe) अगदी झटपट घरीही बनवता येते. त्यासाठीच ही बघा एक सोपी रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 05:43 PM2022-11-05T17:43:47+5:302022-11-05T17:44:31+5:30

Food and Recipe: हॉटेलसारखी मऊ, पातळ रुमाली रोटी ( Rumali Roti Recipe) अगदी झटपट घरीही बनवता येते. त्यासाठीच ही बघा एक सोपी रेसिपी..

How to make hotel like soft rumali roti at home? Easy recipe of making rumali roti | हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी घरीही करता येईल, ते ही झटपट! बघा, रुमाली रोटी करण्याची सोपी रेसिपी

हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी घरीही करता येईल, ते ही झटपट! बघा, रुमाली रोटी करण्याची सोपी रेसिपी

Highlightsरुमाली रोटी भाजण्यासाठी तुम्हाला कढईचा वापर करायचा आहे. हॅण्डालियमची कढई वापरण्याऐवजी लोखंडी कढई वापरणं कधीही अधिक चांगलं.

आपण घरी कधी वेगळी भाजी केली की त्यासोबत आपली नेहमीची पोळी किंवा भाकरी खायला नको वाटते. पोळीतलाच थोडासा वेगळा प्रकार असेल तर मग त्या चवदार भाजीची मजा आणखी वाढते. तुम्हीही रुमाली रोटीचे शौकिन असाल आणि ही रोटी (Easy recipe of making rumali roti) घरच्याघरी कशी करायची, याची रेसिपी शोधत असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. india_food_786 या इन्स्टाग्राम पेजवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. 

 

कशी करायची रुमाली रोटी?
साहित्य

२०० ग्रॅम मैदा. आरोग्याच्या दृष्टीने मैदा फार काही चांगला मानला जात नाही. त्यामुळे तुम्हाला नुसत्या मैद्याची रुमाली रोटी खावी वाटत नसेल तर १०० ग्रॅम मैदा आणि १०० ग्रॅम कणिक असं मिश्रणही तुम्ही घेऊ शकता.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

२५० ग्रॅम दूध

५० ग्रॅम पाणी

१ टीस्पून मीठ

कृती
१. सगळ्यात आधी मैदा किंवा कणिक चाळून घ्या.

२. त्यानंतर त्यात मीठ टाका. 

जगातली सगळ्यात उंच तरुणी, उंची इतकी की पहिल्यांदा विमानात बसायचं तर... पहा तिची इंटरेस्टिंग गोष्ट 

३. थोडं थोडं दूध आणि थोडंसं पाणी असं हळूहळू टाकून पीठ चांगलं मळून घ्या. 

४. हे पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल, तेवढी रोटी मऊ होईल. त्यामुळे ५ ते १० मिनिटे नीट मळून घ्या.

५. त्यानंतर या पीठावर एक ओलसर कपडा टाकून ते १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.

६. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून त्याची अगदी पातळ अशी रोटी लाटावी.

 

हे पण लक्षात ठेवा
१. रुमाली रोटी भाजण्यासाठी तुम्हाला कढईचा वापर करायचा आहे. हॅण्डालियमची कढई वापरण्याऐवजी लोखंडी कढई वापरणं कधीही अधिक चांगलं.

२. ही कढई गॅसवर उपडी टाका. कढई तापली की तिच्यावर आधी मिठाचं पाणी शिंपडा. जेणेकरून रोटी कढईला चिटकणार नाही. त्यानंतर त्यावर थोडे तुप किंवा तेल टाका. आणि एका कापडाने ते कढईला व्यवस्थित लावून घ्या.

३. या दोन्ही गोष्टींमुळे रोटी अधिक मऊसूत होईल. 

 

Web Title: How to make hotel like soft rumali roti at home? Easy recipe of making rumali roti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.