ताडगोळे हे उन्हाळ्यांत येणार अतिशय मऊ आणि रसदार फळ आहे. या ताडगोळ्यांवर एक प्रकारची जाड साल असते. ही सालं काढणं एक फार मोठं कंटाळवाणं काम आहे. परंतु एकदा का साल काढली तर आत रसदार पांढरे गरे म्हणजेच 'ताडगोळे' असतात. ताडगोळे चवीला गोड असून प्रकृतीला थंड असतात. हे एक पाणीदार फळ असल्यामुळं ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास फळाचा आरोग्यासाठी फायदाच होतो. ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं.
गोड शहाळ्यासारखं पाणी आणि बाहेरून जेलीप्रमाणे लिबलिबित असणारे पण चवीला उत्तम असा हा ताडगोळा खायला सगळ्यांनाच आवडतो. याची चव ही शहाळ्यातील पाण्यासारखीच असते पण दिसायला हे फळ लिचीसारखे दिसते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर अधिक हायड्रेट राहण्याची गरज असते. ताडगोळ्यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असल्याने आणि यातून अधिक एनर्जी मिळत असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ताडगोळ्याचा उपयोग होतो. उन्हाळ्यात आपण स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी या ऋतूत येणारी फळ व त्यांचे रस पिणे अधिक पसंत करतो. यंदाच्या उन्हाळ्यांत स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताडगोळ्याचे सरबत नक्की करुन पाहा(How To Make Ice Apple Juice In Summer Season : Homemade Recipe).
साहित्य :-
१. ताडगोळे - ४ ते ५
२. लिंबाचा रस - १ संपूर्ण लिंबाचा रस काढून घ्यावा.
३. काळ मीठ - १/२ टेबलस्पून
४. पाणी - अर्धा लिटर
प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...
आंब्याच्या मौसमात आमरस खाण्याची चंगळ, पण घाईच्यावेळी कसा कराल झटपट आमरस?
कृती :-
१. सर्वप्रथम ताडगोळ्यांच्या वरची साल काढून घ्यावी.
२. आता या ताडगोळ्यांचे लहान लहान आकारात तुकडे करुन घ्यावेत.
३. हे तुकडे एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात एका संपूर्ण लिंबाचा रस घालावा.
महागडे टेंडर कोकोनट आईस्क्रीम आता बनवा घरच्याघरी, शहाळ्याची गारेगार जादू - व्हा फ्रेश...
४. आता या मिश्रणात काळ मीठ चवीनुसार घालून घ्यावे.
५. त्यानंतर यात अर्धा लिटर पाणी ओतून घ्यावे.
ताडगोळ्याचे थंडगार सरबत पिण्यासाठी तयार आहे. हे सरबत आपण एका बाटलीमध्ये भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता.