Lokmat Sakhi >Food > ना मशिन, ना कन्डेंस मिल्क; घरीच फक्त दूध वापरून करा क्रिमी, थंडगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी

ना मशिन, ना कन्डेंस मिल्क; घरीच फक्त दूध वापरून करा क्रिमी, थंडगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी

How to make ice cream at home : आईस्क्रीम बनवण्यासाठी बेकिंगची किचकट प्रोसेस नसल्यामुळे केक फसतो त्याप्रमाणे आईस्कीम फसण्याची भिती नसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 09:20 AM2023-03-31T09:20:00+5:302023-03-31T09:20:01+5:30

How to make ice cream at home : आईस्क्रीम बनवण्यासाठी बेकिंगची किचकट प्रोसेस नसल्यामुळे केक फसतो त्याप्रमाणे आईस्कीम फसण्याची भिती नसते.

How to make ice cream at home : Cashew ice cream recipe | ना मशिन, ना कन्डेंस मिल्क; घरीच फक्त दूध वापरून करा क्रिमी, थंडगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी

ना मशिन, ना कन्डेंस मिल्क; घरीच फक्त दूध वापरून करा क्रिमी, थंडगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकालाच काहीतरी थंड खाण्यची इच्छा होते. दुपारी बाहेरून घरी आल्यानंतर घसा कोरडा पडतो. अशावेळी लिंबू सरबस, कलिंगड ज्यूस किंवा आईस्क्रीम खायला हवी असं वाटतं. नेहमी नेहमी बाहेरचं खाल्यानं आजारी पडण्याची भिती असते. सध्या अवकाळी पाऊस पडल्यानं बाहेर खायला अनेकांना १० वेळा विचार करावा लागतो. जर घरच्याघरी कमीत कमी साहित्यात तुम्ही आईस्क्रीम बनवलं तर घरातले पोटभर खातील आणि जास्तवेळही जाणार नाही.( Cashew ice cream recipe)

काजू, बदाम, पिस्ता किंवा फळांमध्ये आंबा, चिकू, डाळिंब, द्राक्ष अशी तुमच्या आवडीची फळं घालून तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता. आईस्क्रीम बनवण्यासाठी बेकिंगची किचकट प्रोसेस नसल्यामुळे केक फसतो त्याप्रमाणे आईस्कीम फसण्याची भिती नसते. घरी बनवलेलं आईस्क्रीम तुम्ही कोन किंवा कपमध्येही खाऊ शकता. आईस्क्रीम रात्रीच्या जेवणानंतर अनेजण खाणं पसंत करतात. अशावेळी रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर जाण्यापेक्षा घरीच फ्रिजमध्ये दुपारी आईस्क्रीम बनवून ठेवलं असेल तर रात्री या आईस्क्रीमचा आनंद घेता येईल.

गारेगार काजू आईस्क्रीम बनवण्याचं साहित्य

पूर्ण फॅट दूध - 200 मिली 

व्हॅनिला कस्टर्ड पावडर - 2 टीस्पून + दूध 1/2 कप

साखर- 2 कप

अमूल फ्रेश क्रीम- 400 मिली

वाटलेले काजू- 1/2 कप

कृती

१)सगळ्यात आधी २०० मिलीलिटर दूध उकळवून घ्या. 

२) कस्टर्ड पावडर मध्ये पेलाभर दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट दुधात घालून ढवळून घ्या. त्यात एक चमचा साखर घाला.

३) एका वाडग्यात अमूल फ्रेश क्रिम घेऊन त्यात  कस्टर्डची पेस्ट घाला. 

४) यात अर्धा कप काजू पावडर घाला. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून नंतर फ्रिजमध्येसेट होण्यासाठी ठेवा. ६ ते ७ तासांनंतर परफेक्ट, थंडगार आईस्क्रीम तयार होईल. 

Web Title: How to make ice cream at home : Cashew ice cream recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.