Join us  

अर्धा लिटर दुधाचं करा क्रिमी, कस्टर्ड आईस्क्रीम; एकदा खाल तर बाहेरच्या आईस्क्रीमची चव विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 3:40 PM

How to make ice cream easily at home : दूध आपल्या सर्वांच्याच घरी रोज येतं. फक्त अर्धा लिटर दूध वापरून तुम्ही चवदार, स्वादीष्ट आईस्क्रीम बनवू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात  घश्याला गारवा मिळण्यासाठी काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होते. नेहमीच बाहेरून फालूदा, कुल्फी आणणं शक्य नसतं. (Ice Cream Recipe, How to Make Ice Cream) अशावेळी फ्रिजमध्ये घरी बनवलेलं आईस्क्रीम ठेवलं असेल तर सगळेचजण पोटभर खातील याशिवाय घरी बनवलेल्या आईस्क्रीमची चव बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा अधिक चवदार असेल. दूध आपल्या सर्वांच्याच घरी रोज येतं. फक्त अर्धा लिटर दूध वापरून तुम्ही चवदार, स्वादीष्ट आईस्क्रीम बनवू शकता. (How to make ice cream easily at home)

घरच्याघरी आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा लिटर दूध व्यवस्थित तापवून थंड करून घ्या. नंतर त्यातील अर्धा कप दूध बाजूला ठेवून एका कढईत उरलेलं दूध गरम करायला ठेवा. अर्धा कप बाजूला ठेवलेल्या दूधात २ चमचे कस्टर्ड पावडर घालून ते व्यवस्थित मिसळा हे दूध अजिबात गरम असू नये. अन्यथा कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिसळली जात नाही. (Homemade Custard Ice Cream Recipe)

कढईत उकळायला ठेवलेलं दूध ढवळून  घ्या. त्यानंतर या दुधात कस्टर्ड पावडर मिसळलेलं दूध हळूहळू घाला.  जर तुम्हाला दूधात गुठळ्या दिसत असतील तर ते गाळून कढईत घाला. त्यानंतर यात ३/४ कप साखर  घाला. आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त घालू शकता. दूध शिजवताना सतत ढवळत राहा. हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. 

एका भांड्यात १ कप फ्रेश क्रिम घ्या. मशीनच्या मदतीनं ही क्रिम फेटून घ्या. क्रिम व्यवस्थित फेटल्यानंतर त्यात घट्ट झालेलं दूध घाला आणि पुन्हा फेटून  घ्या. त्यात वेनिला इसेसं किंवा मँगो इम्लशन घालू शकता. मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यात आंबा वडीचे लहान लहान काप करून वरून घाला किंवा टुटी-फ्रुटीसुद्धा घालू शकता. सिल्वर फॉईलनं झाकून हे मिश्रण चार ते पाच तास हे मिश्रण सेट केल्यानंतर आईस्क्रीम तयार होईल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स