Lokmat Sakhi >Food > विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे

विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे

How To Make Ice Crystals Free Homemade Ice cream: कोणतीही रेसिपी वापरून आईस्क्रिम तयार करणार असाल तर ते सेट करण्यापुर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा. घरच्या आईस्क्रिममध्ये बर्फाचे कण जमणार नाहीत. (tricks and tips for ice free homemade ice cream)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 12:54 PM2024-04-05T12:54:57+5:302024-04-05T15:09:11+5:30

How To Make Ice Crystals Free Homemade Ice cream: कोणतीही रेसिपी वापरून आईस्क्रिम तयार करणार असाल तर ते सेट करण्यापुर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा. घरच्या आईस्क्रिममध्ये बर्फाचे कण जमणार नाहीत. (tricks and tips for ice free homemade ice cream)

How to make ice crystals free homemade ice cream, why homemade ice cream becomes icy? tricks and tips for ice free homemade ice cream, tips for making soft icecream | विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे

विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे

Highlightsतुम्ही कोणत्याही रेसिपीने आईस्क्रिम करणार असाल तरी या काही गोष्टी लक्षात ठेवा.

सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे बऱ्याच जणींचा घरीच आईस्क्रिम करण्याचा विचार असतो. आईस्क्रिम करून बघण्याची जाम हौस असते. काही जणी त्यात अगदी परफेक्ट असतात. पण बऱ्याच जणींना मात्र घरी आईस्क्रिम तयार करताना एक कॉमन अडचण येते. ती म्हणजे त्यांचं आईस्क्रिम व्यवस्थित सेट होत नाही. कारण त्या आईस्क्रिमला विकतच्या आईस्क्रिमसारखा मऊपणा नसतो. त्यात थोडे का होईना पण बर्फाचे क्रिस्टल्स जमा होतातच (why homemade ice cream becomes icy?). असं का होतं आणि ते होऊ नये म्हणून नेमके काय उपाय करावे ते आता पाहूया (How to make ice crystals free homemade ice cream). तुम्ही कोणत्याही रेसिपीने आईस्क्रिम करणार असाल तरी या काही गोष्टी लक्षात ठेवा. (tips for making soft ice cream)

 

घरी केलेल्या आईस्क्रिममध्ये बर्फ जमा होऊ नये म्हणून उपाय

१. यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने आईस्क्रिम केलं तरी ते करत असताना दूध व्यवस्थित आटवून घ्या. दूध जर पातळ असेल तर त्यात असणाऱ्या पाण्याचा बर्फ तयार होतो.

ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का?

त्यामुळे दूध अगदी दाट करून घ्या. दूध दाट करण्यासाठी कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडरचा उपयोग करू शकता. आईस्क्रिम करण्यासाठीचं दूध बासुंदीसारखं घट्ट असावं. 

 

२. आईस्किम ज्या डब्यात सेट करायला ठेवणार आहात, त्याच्यावर आधी प्लास्टिकची पिशवी ठेवा आणि मग त्याच्यावरून झाकण लावा.

तरुणपणी घोट्यापर्यंत लांब होते जया बच्चनचे केस, लांबसडक केसांसाठी करायच्या 'हा' घरगुती उपाय

तसेच आईस्क्रिमचा डबा एखाद्या झिपलॉकच्या प्लास्टिक बॅगमध्ये घाला. त्याच्या आतली हवा सगळी काढून घ्या आणि मग तो फ्रिजरमध्ये सेट करायला ठेवा.


 

Web Title: How to make ice crystals free homemade ice cream, why homemade ice cream becomes icy? tricks and tips for ice free homemade ice cream, tips for making soft icecream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.