Join us  

इडलीसाठी डाळ तांदूळ भिजवताना घाला २ पांढऱ्याशुभ्र गोष्टी, उडपीस्टाईल परफेक्ट इडली करा घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 12:55 PM

How To Make Idli At Home | South Indian Cuisine : थंडीत इडलीचे पीठ अजिबात फुगत नसेल तर, त्यात २ सिक्रेट गोष्ट मिसळा, पीठ फुलेल मस्त-इडल्या होतील लुसलुशीत

हिवाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत नाश्त्याला बरेच जण आवडीने इडली (Idli) खातात. इडली खाण्याचे अनेक फायदे (Health Benefits) आहेत. मुख्य म्हणजे इडलीमध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन वाढत नाही. शिवाय वजन कमी करण्यास मदत होते. सकाळी हलकी-फुलकी इडली, सोबत चटणी आणि सांबार खाण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. काही जण अण्णाच्या स्टॉलवर जाऊन इडली खातात. तर, काही जण घरी इडली तयार करतात.

सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे घरी इडलीचे पीठ लवकर फरमेण्ट होत नाही. जर आपल्याला घरच्या घरी अण्णाच्या गाड्यावर मिळते तशी इडली करायची असेल (Cooking Tips) तर, पीठ भिजत घालताना त्यात २ गोष्टी घालायला विसरू नका. यामुळे इडलीचे बॅटर व्यवस्थित आंबेल. शिवाय इडली हलकी-फुलकी सॉफ्ट तयार होतील(How To Make Idli At Home | South Indian Cuisine).

अण्णाच्या गाड्यावर मिळते तशी इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

पोहा

साबुदाणा

२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी

मेथी दाणे

उडीद डाळ

पाणी

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये ३ कप जाड तांदूळ, अर्धा कप पोहा, अर्धा कप साबुदाणा, एक टेबलस्पून मेथी दाणे व ४ कप पाणी घालून सर्व साहित्य धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा ४ कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवा. ६ ते ७ तासांसाठी साहित्य भिजत ठेवा. दुसऱ्या एका भांड्यात एक कप उडीद डाळ व पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यावर ४ ते ५ तासांसाठी झाकण ठेऊन भिजत ठेवा.

मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ घालून पेस्ट तयार करा. डाळ वाटताना आपण त्यात एक चमचा डाळीचं पाणी घालू शकता. यामुळे डाळीची पेस्ट गुळगुळीत तयार होईल. शिवाय इडलीही सॉफ्ट तयार होतील. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात भिजलेले तांदूळ घालून वाटून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात डाळीची पेस्ट घालून मिक्स करा. नंतर हाताने दोन्ही पेस्ट एकत्र मिक्स करा. पेस्ट मिक्स करून झाल्यानंतर ८ ते १० तासांसाठी त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून पीठ व्यवस्थित आंबेल. आपण रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेऊ शकता. १० तासानंतर झाकण उघडा. त्यात चवीनुसार मीठ घालून चमच्याने मिक्स करा. यामुळे पीठ छान फुलेल.

२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त

इडली पात्राला ब्रशने तेल लावा, व त्यावर चमचाभर बॅटर सोडा. स्टीमरमध्ये पाणी घालून ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात इडली पात्र ठेऊन झाकण ठेवा. १५ मिनिटांसाठी इडली वाफवून घ्या. १५ मिनिटानंतर इडली पात्र काढून, चमच्याने इडली काढून घ्या. अशा प्रकारे वाफाळलेली इडली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स