Join us  

डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ मिसळा; थंडीतही दुप्पट फुलेल इडलीचं पीठ-मऊ होतील इडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 11:12 AM

How to Make Idli Batter Ferment Quickly (Ghari Idali Kashi Banvaychi) : वातारवणात गारवा असल्यामुळे पीठ व्यवस्थित फुलत नाही, पीठ न आंबल्यामुळे इडली किंवा डोसा विकतसारखा मऊ, फुललेला बनत नाही.

नाश्त्याला इडली डोसा असे पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. पण नेहमी नेहमी बाहेर खाल्ल्यामुळे पोटाचे त्रास उद्भवू शकतात. घरच्याघरी परफेक्ट इडल्या बनवणं थंडीच्या दिवसांत खूप कठीण असतं. (Easy Tips To Make Soft and Spongy Idli At Home)  वातारवणात गारवा असल्यामुळे पीठ व्यवस्थित फुलत नाही, पीठ न आंबल्यामुळे इडली किंवा डोसा विकतसारखा मऊ, फुललेला बनत नाही. (How to ferment idli batter faster)

थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ व्यवस्थित फुलावं यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवू शकता.  ज्यामुळे घरी केलेला पदार्थही बाहेरच्या गाड्यांवर मिळतो तसा  लागेल. (How to Make Soft and Spongy Idli) यासाठी तुम्ही कोणत्या तांदळाची निवड करतात. त्यात डाळ-तांदळाचे प्रमाण किती असते याकडे लक्ष देणं गरजेचं असते. (How to Prepare Soft and Spongy Idli)

१) १ किलो तांदळासाठी अर्धा किलो उडीदाची डाळ असे प्रमाण ठेवा. नरम आणि स्पाँजी इडली बनवण्यासाठी इडलीच्या बॅटरमध्ये यीस्ट घाला आणि काहीवेळासाठी तसंच ठेवून द्या. जेणेकरून बॅटर व्यवस्थित फुलेल. खासकरून हिवाळ्यात इडलीचं पीठ आंबवणं कठीण असते, हे १ ते २ दिवस आंबायला लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात तापमान जास्त असल्यामुळे यीस्ट नाही घातले तरी चालते.

२) साधारणपणे लोक जेव्हा इडली बनवतात तेव्हा डाळ आणि तांदळाच्या बॅटरमध्ये बेकींग सोडा मिसळतात. जेणेकरून इडली  मऊ आणि स्पंजी राहील.   जर तुम्ही यात इनो मिसळा तर इडल्या जास्तवेळ सॉफ्ट राहतील. यामुळे पीठ कमी वेळेत आंबेल. पीठाचे प्रमाण लक्षात घेऊन १ ते २ पाकीट इनो मिसळा. 

भाजी करताना रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी काय करायचं? ५ टिप्स-हॉटेलसारख्या भाज्या होतील घरी

३)  इडल्या मऊ होण्यासाठी यात एक वाटी पोह्यांची पेस्ट तयार करून ती मिसळा. यामुळे इडलीचे बॅटर दुप्पट फुलेलं आणि चवही चांगली येईल. न विसरता इडलीच्या पीठात १ ते २ चमचे मेथी दळून घाला. जास्त वापर करून नका अन्यथा इडलीला कटवडपणा येऊ शकतो. 

४)  पीठ जितकं छान  फुलेल इतक्यात इडल्या मऊ आणि स्पाँजी होतील. बॅटर तयार करताना त्यात चवीनुसार दही घाला. तुम्हाला जास्त आंबट इडल्या आवडत असतील तर ताक किंवा दही जास्त घाला. ताज्या दह्याचा वापर करा. बॅटर दह्याबरोबर मिसळ्याने आंबवण्याची प्रक्रिया अधिकच वेगात होते.

१ वाटी डाळ-तांदुळात चमचमीत मस्त बेत; 'झटपट खान्देशी खिचडी' करण्याची घ्या पारंपरिक रेसिपी

५) इडलीसाठी डाळ-तांदूळाचे पीठ दळून झाल्यानंतर हाताने गोलाकार फिरवून हे मिक्षण ढवळा. जेणेकरून यात हवा जाईल आणि इडल्या परफेक्ट बनतील. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससुंदर गृहनियोजन