Lokmat Sakhi >Food > थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

How to Make Idli Batter Ferment Quickly in Winter : तांदूळ भिजवण्यापासून पीठ दळेपर्यंत अनेक छोट्या-छोट्या प्रोसेस व्यवस्थित कराव्या लागतात.  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:30 PM2023-11-30T12:30:00+5:302023-12-02T11:20:49+5:30

How to Make Idli Batter Ferment Quickly in Winter : तांदूळ भिजवण्यापासून पीठ दळेपर्यंत अनेक छोट्या-छोट्या प्रोसेस व्यवस्थित कराव्या लागतात.  

How to Make Idli Batter Ferment Quickly in Winter : How to Ferment Idli Batter in Winter Easy Cooking Tips | थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

सकाळच्यावेळी ब्रेकफास्टमध्ये खाण्यासाठी प्रत्येकालाच इडली, डोसा फार आवडतो. कारण हे पदार्थ  कमी तेलकट असतात आणि खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं. २ ते ३ इडल्या खाल्ल्या तरी दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागत नाही आणि यातून पौष्टीक घटकही शरीराला मिळतात. दिवसभर शरीर एनर्जेटीक राहतं. (Cooking Hacks)

काहीजण चटणीबरोबर तर काहीजण सांबारबरोबर इडली खातात. घरी इडली करायचं म्हटलं की तांदूळ भिजवण्यापासून पीठ दळेपर्यंत अनेक छोट्या-छोट्या प्रोसेस व्यवस्थित कराव्या लागतात.  थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ व्यवस्थित फुलत नाही अशी अनेकांची तक्रार असते. इडली करण्याच्या बेसिक टिप्स लक्षात ठेवल्या तर हॉटेलसारखा इडली सांबार घरीच बनवता येईल. (How to ferment idli batter faster)

१) परफेक्ट इडली बॅटर बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत ३ कप तांदूळ घ्या. तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ ५ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.

2) त्यानंतर दीड कप उडीदाची  डाळ धुवून घ्या. एका भांड्यात ही डाळ सुद्धा भिजवायला ठेवा.   उडीदाच्या डाळीत १ चमचा मेथीचे दाणे घाला.

3) नंतर एक बाऊल घ्या त्यात १/४ कप पोहे घालून ३ ते ४ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. ४ तासांनी उडीदाची दाळ गाळून त्याचे पाणी काढून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्याबरोबर पोहेसुद्धा बारीक करा. 

4)  नंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून दळून घ्या. दळताना थंड पाणी घालून मग तांदूळ दळा आणि एका भांड्यात काढून घ्या.  तांदळाच्या दळलेल्या पीठात उडीदाच्या डाळीचे दळलेले मिश्रण घालून ४ ते ५ मिनिटांसाठी फेटून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा. ८ ते १० तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवण्यासाठी ठेवा. 

१ कप डाळ-तांदूळाचा करा मऊ, जाळीदार खमन ढोकळा; मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा बनेल घरीच

5) पीठ व्यवस्थित आंबवल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित मिसळून त्यात मीठ आणि बेकींग सोडा घाला. हे बॅटर तुम्ही ४ दिवसांसाठी फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. जर तुम्हाला हे बॅटर लगेच वापरायचं नसेल तर फ्रिजमध्ये घट्ट डब्यात घालून स्टोअर करा. 

6) इडलीच्या साच्याला तेल लावून तुम्ही त्यात हे बॅटर घालून इडली शिजवून घेऊ शकता.  स्टिमर गॅसवर ठेवून त्यात ग्लासभर पाणी घाला आणि पाणी मध्यम आचेवर गरम झाल्यानंतर त्यात इडलीचे स्टॅण्ड ठेवून झाकण लावून ठेवा. १५ ते २० मिनिटं शिजवल्यानंतर इडली तयार झालेली असेल. इडली एका प्लेटमध्ये काढून घ्या. तयार आहे स्पॉन्जी गरमागरम इडल्या.

Web Title: How to Make Idli Batter Ferment Quickly in Winter : How to Ferment Idli Batter in Winter Easy Cooking Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.