Join us  

इडलीचं पीठ आंबवण्याची योग्य पद्धत कोणती? इडल्या उत्कृष्ट होण्यासाठी उत्तम उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 9:33 AM

How to make idli batter ferment quickly : इडली प्लफी होण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे पिठात मिसळू शकता. मेथीच्या दाण्यांचा अतिप्रमाणात वापर करू नका. अन्यथा कटवड चव येऊ शकते.

रोज घरचं खाऊन कंटाळा आला की विकेंडच्या वेळी नाश्त्याला बाहेरचे पदार्थ खाण्याची इच्छा होते. इडली, डोसा हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. नेहमी बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्याघरी इडली, डोसा बनवला तर कमी खर्चात घरातले सगळेजण पोटभर खातात.  (What made the idli Soft & Fluffy) नाश्त्यासह दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणालाही हे पदार्थ खाता येतात. घरी हॉटेलसारख्या चवीचे पदार्थ सर्वांनाच जमतात असं नाही. घरच्याघरी सोप्या पद्धतीनं पीठ आंबवून इडल्या बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to make perfect idli batter)

१) इडली, स्पॉजी बनावी असं तुम्हालाही वाटत असेल तर योग्य प्रकारे तांदळांची निवड करणं गरजेचं आहे. इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी तुम्ही बासमती तांदळांचा वापर करू शकता. यासाठी इडलीचे तांदूळ किंवा पारबॉइल्ड तांदूळ वापरेलं उत्तम ठरतं. 

२) तांदूळ आणि डाळ हे २  घटक प्रामुख्याने इडली बनवण्यासाठी वापरले जातात. दोन कप तांदळासाठी एक वाटी डाळ वापरावी लागेल. जर चांगल्या इडल्या बनायला हव्या असतील तर ताजी डाळ वापरा खूप दिवसांपासून साठवून ठेवलेली डाळ अजिबात वापरू नका.

३) जेव्हा तुम्ही डाळी आणि तांदूळ भिजवल्यानंतर बारीक करता तेव्हा त्या वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. आपण फूड प्रोसेसरऐवजी ग्राइंडर वापरू शकता. डाळ दळताना गरम पाणी घालू नये. दळण्यासाठी वापरलं जाणारं पाणी नेहमी थंड असावं.

४) इडली प्लफी होण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे पिठात मिसळू शकता. मेथीच्या दाण्यांचा अतिप्रमाणात वापर करू नका. अन्यथा कडवट चव येऊ शकते. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न