Join us  

इडल्या फुलत नाहीत-कडक होतात? डाळ-तांदूळ वाटताना ‘हा’ पदार्थ मिसळा; सॉफ्ट होतील इडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 4:33 PM

How To Make Idli Batter Know Secret Recipe To Prepare Idli : इडल्यांचे पीठ फुलत नाही, इडल्या आंबट होतात अशी अनेकांची तक्रार असते.

साऊथ इंडियन घरांमध्येच नाहीच अनेक भारतीय इडली खाल्ली जाते. (Idli) बाजारात मिळणारी इडली सॉफ्ट आणि स्पॉन्जी असते तशी इडली घरांत बनत नाही. इडली तयार करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. इडल्यांचे पीठ फुलत नाही, इडल्या आंबट होतात अशी अनेकांची तक्रार असते. इडल्या करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. (How To Make Idli Batter Know Secret Recipe To Prepare Idli)

इडली बॅटर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Idli Batter)

१) मीठ - चवीनुसार

२) तांदूळ - ३ कप

३) उडीदाची डाळ - १ कप

४) पोहा- १/४ कप

५) मेथीचे दाणे- १ टिस्पून

६) मीठ- चवीनुसार

टेस्टी इडल्या करण्यासाठी इडलीचं बॅटर योग्य असायला हवं. यासाठी सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.  यासाठी सगळ्यात आधी तांदूळ साफ करून घ्या. तांदूळ ३ ते ४ पाण्याने व्यवस्थित धुवून  घ्या. ६ ते ७ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.  उडीदाची डाळ दोन ते तीन पाण्यानी व्यवस्थित धुवून घ्या.  नंतर मिक्सरमधून काढून घ्या. त्यात थोडे मेथीचे जाणे मिसळा ४ ते ५ तासांसाठी भिजवून ठेवा. 

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

पोहे साफ करून धुवून घ्या ४ तासांसाठी भिजवून ठेवा. उडीदाची डाळ आणि मेथीचे  दाणे पाण्यातून काढून मिक्सर जारमधून काढून वाटून घ्या. ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काडा. त्यानंतर तांदूळ आणि पोहे मिक्सरमधून वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा. तांदूळाची पेस्ट एका भांड्यात काढून मिक्स करा. 

आमीर खानने कसं कमी केलं २७ किलो वजन? वजन झटपट कमी करण्यासाठी पाहा त्याचं ‘खास’ डाएट

मेथीदाणे, तांदूळ आणि पोह्यांची पेस्ट कमीत कमी ५ मिनिटं चांगलं फेटून घ्या. त्यानंतर भांडं झाकून ठेवा. एखाद्या गरम ठिकाणी ८ ते १० तासांसाठी ठेवा. थोड्यावेळानंतर पुन्हा फेटून घ्या, चवीनुसार मीठ घाला. सकाळी हे बॅटर  चमच्याने ढवळून घ्या आणि इडली पात्राला तेल लावून त्यात हे बॅटर घाला.  रेस्टारंटसारखी टेस्टी इडली बनून  तयार होईल. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स