Lokmat Sakhi >Food > World Idali Day: इडलीची बिर्याणी आणि साबुदाण्याची इडली....बघाच एकदा खाऊन, ब्रेकफास्टसाठी घ्या ३ सुपर हेल्दी रेसिपी

World Idali Day: इडलीची बिर्याणी आणि साबुदाण्याची इडली....बघाच एकदा खाऊन, ब्रेकफास्टसाठी घ्या ३ सुपर हेल्दी रेसिपी

Food and Recipe: सुटीचा निवांत दिवस आहे आणि मस्त चटपटीत पण काहीतरी वेगळा, हटके नाश्ता करायचाय? असं काही प्लॅनिंग असेल तर या ३ रेसिपी (breakfast recipe) तुम्हाला नक्कीच आवडतील. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 12:50 PM2022-03-30T12:50:58+5:302022-03-30T14:28:55+5:30

Food and Recipe: सुटीचा निवांत दिवस आहे आणि मस्त चटपटीत पण काहीतरी वेगळा, हटके नाश्ता करायचाय? असं काही प्लॅनिंग असेल तर या ३ रेसिपी (breakfast recipe) तुम्हाला नक्कीच आवडतील. 

How to make idli biryani and sabudana idli? 3 super healthy and protein rich recipe for breakfast | World Idali Day: इडलीची बिर्याणी आणि साबुदाण्याची इडली....बघाच एकदा खाऊन, ब्रेकफास्टसाठी घ्या ३ सुपर हेल्दी रेसिपी

World Idali Day: इडलीची बिर्याणी आणि साबुदाण्याची इडली....बघाच एकदा खाऊन, ब्रेकफास्टसाठी घ्या ३ सुपर हेल्दी रेसिपी

Highlightsइडली, बिर्याणी तुम्ही नेहमीच खाल्ली असणार, पण या दोन्ही पदार्थांचं कॉम्बिनेशनही भलतंच सुपरहिट होतं बरं का...

सुटीच्या दिवशी सगळे घरी निवांत असले की नवनविन पदार्थ बनवण्याची फर्माईश येत असते.. घरातल्या स्त्रियाही सुटीच्या दिवशी निवांत असल्याने त्यांनीही सुटी सेलिब्रेट करण्यासाठी काय वेगळा मेन्यू करायचा, त्याचं प्लॅनिंग आखून ठेवलेलं असतं. नाश्ता आणि जेवणात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हवं... ही घरातल्यांची डिमांड पुर्ण करायची असेल तर नाश्ता प्रकारात काय काय करता येईल हे आजच बघून ठेवा.. इडली, बिर्याणी तुम्ही नेहमीच खाल्ली असणार, पण या दोन्ही पदार्थांचं कॉम्बिनेशनही भलतंच सुपरहिट होतं बरं का... म्हणूनच तर वाचा या ३ रेसिपी आणि तुमच्या वेळेनुसार करूनही बघा... (various recipies from idali)

 

१. इडली बिर्याणी (idali biryani)
हा एक अतिशय चवदार आणि झटपट होणारा पदार्थ. यासाठी इडल्या (World Idali Day) तयार करून घ्या आणि त्या एकसारख्या आकारात कापून ठेवा. आता कढईमध्ये वेलची, लवंग, गरम मसाला, बिर्याणी मसाला, कांदा, टोमॅटो, बीन्स यांची फोडणी करून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये एक लेयर भाज्यांचा आणि मसाल्याचा, त्यावर इडलीचा लेयर आणि पुन्हा एकदा मसाले आणि भाज्यांचा लेअर टाका. कुकरमध्ये ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम इडली बिर्याणी झाली तयार. पुदिना, काजू, कोथिंबीर टाकून मस्त गार्निशिंग करून घ्या. 

 

२. व्हेजी ओट्स इडली (oats idali)
या प्रकारात आपल्याला तांदळापासून इडली तयार करायची नाही. ओट्सपासून आपण इडली पीठ तयार करणार आहोत. या पीठामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या भाज्या कापून टाका आणि इडल्या लावा. चवदार आणि प्रोटीन्सचे भरपूर प्रमाण असणाऱ्या सुपर हेल्दी व्हेजी ओट्स इडली झाल्या तयार. 

 

३. इन्स्टंट साबुदाणा इडली (sabudana or sabakki idali)
इडलीचा हा प्रकारही अतिशय चवदार आणि पौष्टिक आहे. नावातूनच आपल्या लक्षात येतंय की ही इडली आपण साबुदाण्यापासून तयार करणार आहोत. या इडलीला सबक्की इडली असंही म्हणतात. साबुदाणा इडलीचं पीठ तयार करण्यासाठी साबुदाणा, रवा आणि दही अर्धा तास भिजत घाला. त्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यात चिमुटभर खाण्याचा सोडा टाका आणि चवीनुसार मीठ टाका. या पीठापासून गरमागरम इडली बनवा आणि नेहमीप्रमाणे नारळाची चटणी, सांबार यासोबत खा.

 


 

Web Title: How to make idli biryani and sabudana idli? 3 super healthy and protein rich recipe for breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.