Lokmat Sakhi >Food > फक्त १५ मिनिटांत करा उपवासाची मऊसूत इडली, हवा फक्त भगर आणि बटाटा- घरातही सर्वांनाच आवडेल

फक्त १५ मिनिटांत करा उपवासाची मऊसूत इडली, हवा फक्त भगर आणि बटाटा- घरातही सर्वांनाच आवडेल

Navratri 2024: भगर, साबुदाणा, भाजणीचे थालिपीठ हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट उपवासाची इडली करून खा...(How To Make Idli For Fast?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2024 01:02 PM2024-10-05T13:02:51+5:302024-10-05T14:10:44+5:30

Navratri 2024: भगर, साबुदाणा, भाजणीचे थालिपीठ हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट उपवासाची इडली करून खा...(How To Make Idli For Fast?)

how to make idli for fast, special idli for navratri fast, simple and easy recipe for idli | फक्त १५ मिनिटांत करा उपवासाची मऊसूत इडली, हवा फक्त भगर आणि बटाटा- घरातही सर्वांनाच आवडेल

फक्त १५ मिनिटांत करा उपवासाची मऊसूत इडली, हवा फक्त भगर आणि बटाटा- घरातही सर्वांनाच आवडेल

Highlightsमुलांना कधीकधी काही वेगळा पदार्थ पाहिजे असल्यास तुम्ही त्या चटकन करूनही देऊ शकाल.

नवरात्रीनिमित्त बऱ्याच जणांच्या घरात उपवास असतात (Navratri 2024). उपवासामुळे मग साबुदाण्याची खिचडी, भगर, बटाट्याचे पदार्थ, भाजणीचे थालिपीठ असं नेहमीच खाण्यात येतं. सुरुवातीला हे पदार्थ बरे वाटतात. पण नंतर मात्र तेच ते पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो. म्हणूनच चवीमध्ये थोडा बदल म्हणून आता उपवासाच्या इडल्या करून पाहा. एरवीही इतर कोणत्याही उपवासाला तुम्ही या इडल्या करून खाऊ शकता. या इडल्यांची चव एवढी छान आहे की लहान मुलांसकट घरातल्या सगळ्यांनाच त्या आवडतील (simple and easy recipe for idli). शिवाय मुलांना कधीकधी काही वेगळा पदार्थ पाहिजे असल्यास तुम्ही त्या चटकन करूनही देऊ शकाल.(special idli for navratri fast)

उपवासाची इडली करण्याची रेसिपी 

 

साहित्य

२ मध्यम आकाराचे बटाटे

१ वाटी भगर

भगर- खिचडी नेहमीचीच! नवरात्रीच्या उपवासाला करा खमंग- खुसखुशीत पुऱ्या, घ्या सोपी रेसिपी 

२ चमचे दही

चवीनुसार मीठ

१ चमचा इनो किंवा बेकिंग सोडा. 

 

कृती

सगळ्यात आधी तर बटाट्याची सालं काढून घ्या आणि त्यांचे बारीक काप करून तुकडे करून घ्या. आता बटाट्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घाला त्यात थोडं पाणी घाला आणि ते बारीक करून घ्या. 

लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून मान आखडून गेली? ३ सोपे व्यायाम, लगेचच बरं वाटेल!

यानंतर एक ते दिड वाटी भगर घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून तिचं पीठ करून घ्या.

एका भांड्यात बटाट्याचा रस, भगर, दही, चवीनुसार मीठ घाला आणि पाणी घालून हे मिश्रण हलवून घ्या. ५ ते १० मिनिटे त्यावर झाकण ठेवून द्या.

 

त्यानंतर या मिश्रणात थोडा बेकिंग सोडा किंवा थोडं इनो घाला आणि नेहमीप्रमाणे इडली पात्राला शेंगदाण्याचं तेल किंवा तूप लावून त्यात हे पीठ टाका.

'या' ५ वेळांना कधीही स्वतःचं वजन करू नका! नेहमी खोटा आकडाच समोर येईल

१० मिनिटे मध्यम आचेवर या इडल्या शिजू द्या. मऊ, लुसलुशीत उपवासाच्या इडल्या झाल्या तयार..

या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. 


 

Web Title: how to make idli for fast, special idli for navratri fast, simple and easy recipe for idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.