Lokmat Sakhi >Food > गरम पाण्याच्या किटलीत करा १० मिनिटांत पोडी इडली, पाहा इडलीपात्राशिवाय झटपट इडली करण्याची रेसिपी...

गरम पाण्याच्या किटलीत करा १० मिनिटांत पोडी इडली, पाहा इडलीपात्राशिवाय झटपट इडली करण्याची रेसिपी...

Idli In Kettle : How to make Idli without Idli Maker : How to make idli in hot water kettle : Make podi idli in hot water kettle in 10 minutes : पोडी इडली करण्यासाठी खूप मोठा घाट न घालता केटलचा असा करा वापर, इडली होईल पटकन रेडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 03:20 PM2024-09-25T15:20:07+5:302024-09-25T15:34:26+5:30

Idli In Kettle : How to make Idli without Idli Maker : How to make idli in hot water kettle : Make podi idli in hot water kettle in 10 minutes : पोडी इडली करण्यासाठी खूप मोठा घाट न घालता केटलचा असा करा वापर, इडली होईल पटकन रेडी...

How to make idli in hot water kettle Make podi idli in hot water kettle in 10 minutes | गरम पाण्याच्या किटलीत करा १० मिनिटांत पोडी इडली, पाहा इडलीपात्राशिवाय झटपट इडली करण्याची रेसिपी...

गरम पाण्याच्या किटलीत करा १० मिनिटांत पोडी इडली, पाहा इडलीपात्राशिवाय झटपट इडली करण्याची रेसिपी...

सकाळच्या नाश्त्याला आपल्याकडे बरेचदा पांढरीशुभ्र, मऊ, लुसलुशीत इडली केली जाते. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी इडली हा पर्याय सगळ्यांनाच आवडतो. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली सर्वात जास्त फेमस आहे. इडलीचे अनेक प्रकार केले जातात. स्टफ इडली, मसाला इडली, फ्राय इडली, इडली चिली असे अनेक प्रकार अगदी आवडीने खाल्ले जातात. इडली हा पदार्थ खायला जितका हलका - फुलका आहे तितकाच तो तयार करायला खूप मोठा घाट घालावा लागतो(Make podi idli in hot water kettle in 10 minutes).

डाळ - तांदूळ भिजत घालूंन त्याचे बॅटर तयार करा, ते बॅटर फुगून येण्यासाठी ठेवा, इडली पात्रात हे बॅटर घालूंन इडल्या काढा असे सगळेच साग्रसंगीत करावे लागतेच. यावर एक झटपट सोपा उपाय म्हणजे इडली तयार करण्यासाठी गरम पाण्याचा केटलचा वापर करणे. या केटलचा वापर करून आपण अगदी झटपट इडली तयार करु शकतो. यासाठी मोठमोठाले इडली पात्र वापरण्याची गरजच भासणार नाही. इडली तयार करण्यासाठी केटलचा (Idli In Kettle) नक्की कसा वापर करावा आणि याच केटलमध्ये आपली नॉर्मल रोजची इडली आणि पोडी इडली कशी तयार करावी याची सोपी रेसिपी पाहूयात(How to make idli in hot water kettle).

साहित्य :- 

१. इडली बॅटर - १ कप
२. मीठ - गरजेनुसार
३. तेल - ५ ते ६ टेबलस्पून 
४. तूप - १ टेबलस्पून 
५. जिरे - १ टेबलस्पून 
६. मोहरी - १ टेबलस्पून 
७. कडीपत्ता - ७ ते ८ पानं 
८. पोडी मसाला - १ टेबलस्पून 
९. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

पितृपक्ष: चविष्ट भाज्यांसाठी करा ‘खास’ वाटण, स्वयंपाक तर झटपट होईलच-भाज्याही लागतील चवदार...


पापडाची चटणी खा, झणझणीत कुरकुरीत सुकी चटणी म्हणजे निव्वळ सुख, तोंडाला येईल चव...

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये इडली बॅटर घेऊन त्यात चवीनुसार थोडे मीठ घालूंन घ्यावे. 
२. आता एक स्टीलचा छोटा ग्लास घेऊन त्याला आतील बाजूने संपूर्णपणे तेल लावून तो व्यवस्थित ग्रीस करुन घ्यावा. 
३. त्यानंतर या तेल लावलेल्या स्टीलच्या ग्लासात तयार इडली बॅटर ओतून घ्यावे. आता गरम पाण्याच्या केटलमध्ये तळाशी थोडेसे पाणी घालून ते गरम करून घ्यावे. या गरम पाण्यात एक डिश किंवा छोटे स्टॅन्ड ठेवावे. त्या स्टॅण्डवर हा इडली बॅटरचा ग्लास ठेवून केटल बंद करावी. 

भाज्या लवकर शिळ्या - खराब होऊ नयेत म्हणून पाहा  सोपी पद्धत, आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश... 

४. १५ ते २० मिनिटे केटलमध्ये हे बॅटर ठेवून व्यवस्थित वाफवून घ्यावे. त्यानंतर केटल मधून हा ग्लास काढून ग्लासात तयार झालेली इडली बाहेर काढून घ्यावी. 
५. या इडलीचे गोलाकार तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर या गोलाकार तुकड्याचे चार छोटे छोटे तुकडे करुन घ्यावेत.
६. आता याच गरम केटलमध्ये थोडेसे तूप घालूंन त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, पोडी मसाला, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. आता या मिश्रणात इडलीचे छोटे तुकडे घालूंन सगळे जिन्नस चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावेत. 

केटलमध्ये अगदी झटपट होणारी पोडी इडली खाण्यासाठी तयार आहे.         

Web Title: How to make idli in hot water kettle Make podi idli in hot water kettle in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.