Join us  

४ महिने टिकेल असं इडलीचं पीठ एकदाच बनवून ठेवा, पाहिजे तेव्हा १० मिनिटांत इडल्या तयार... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 12:19 PM

How To Make Idli Premix For Instant Idli: पाहिजे तेव्हा १० मिनिटांत इस्टंट इडली करण्यासाठी हे पीठ अतिशय उपयुक्त आहे. सकाळच्या घाई- गडबडीत हे पीठ हाताशी असणं केव्हाही उत्तम.. बघा कसं तयार करायचं...(spongy fluffy idli in just 10 minutes)

ठळक मुद्देहे पीठ ३ ते ४ महिने अगदी चांगलं टिकतं. पाहिजे तेव्हा १० मिनिटांत तुम्ही पिठापासून गरमागरम मऊसूत इडल्या करू शकता.

इडली हा बहुतांश लोकांचा आवडीचा नाश्ता. मग तो सांबार किंवा चटणी असं कशासोबतही चालतो. बऱ्याचदा मुलांना डब्यात इडली दिली की ते ही खूश होतात. पण इडली करायची म्हटलं की डाळ, तांदूळ भिजत घाला, मग ते वाटून घ्या, त्यानंतर ते आंबवून घ्या, अशा बऱ्याच प्रक्रिया त्यावर कराव्या लागतात. काही जणींना एवढा कुटाणा करत बसण्याचा कंटाळा येतो, तर काही जणींकडे खरंच तेवढा वेळ नसतो. म्हणूनच आता इडलीचं प्रिमीक्स कसं तयार करायचं ते पाहा (spongy fluffy idli in just 10 minutes). हे पीठ ३ ते ४ महिने अगदी चांगलं टिकतं. पाहिजे तेव्हा १० मिनिटांत तुम्ही पिठापासून गरमागरम मऊसूत इडल्या करू शकता (how to make idli instantly). इडलीचं प्रिमिक्स करण्याची बघा एकदम सोपी रेसिपी... (how to make idli premix for instant idli)

 

इडलीचं प्रिमिक्स तयार करण्याची रेसिपी

इडलीचं प्रिमिक्स कसं तयार करायचं याची रेसिपी vaishalisrecipe या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

फक्त ६ पदार्थ रोज आठवणीने खा! केसांचे सगळे प्रॉब्लेम जातील, केस गळणार नाहीत- वाढतील भराभर

साहित्य

२ कप तांदूळ

१ कप उडीद डाळ

अर्धा कप पोहे

१ टीस्पून मेथ्या

 

कृती

सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ २- ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर ते एका कपड्यावर पसरवून वाळवून घ्या.

लगेच थकवा येतो, पाठ- कंबर गळून जाते? तज्ज्ञ सांगतात, महिलांनी भरपूर एनर्जीसाठी खावे ५ पदार्थ

वाळलेले तांदूळ आणि डाळ एकेक करून कढईमध्ये गरम करून घ्या. जेणेकरून त्यांच्यातला ओलावा निघून जाईल. 

यानंतर डाळ, तांदूळ, मेथ्या आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याचं बारीक पीठ करून घ्या. हे पीठ एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवल्यास ते ३ ते ४ महिने चांगलं टिकेल.

 

इडली प्रिमिक्सपासून इडल्या कशा करायच्या?

१. आपण तयार केलेल्या इडली प्रिमिक्सपासून दोन पद्धतींनी इडली तयार करता येते. पहिल्या पद्धतीनुसार इडलीचं प्रिमिक्स एका भांड्यात घ्या. १ कप प्रिमिक्स असेल तर त्यात १ कप दही टाका. चवीनुसार मीठ घाला. पाणी टाकून मिश्रण हलवून घ्या. यानंतर ५ मिनिटे ते झाकून ठेवा. त्यानंतर त्यात थोडासा सोडा किंवा इनो टाका आणि मग त्याच्या नेहमीप्रमाणे इडल्या लावा.

पावसाळ्यात मुलं शाळेत जातात आणि दुखणं घेऊन येतात-५ पदार्थ खाऊ घाला, इम्युनिटी भरपूर वाढेल

२. दुसऱ्या पद्धतीनुसार इडलीचं पीठ पाणी टाकून भिजवून घ्या आणि रात्रभर झाकून ठेवून ते आंबवून घ्या. त्यानंतर दुसऱ्यादिवशी त्याच्या नेहमीप्रमाणे इडल्या करा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.