Lokmat Sakhi >Food > आजीच्या हातच्या सुंठगुळाच्या गोळ्या आठवतात ? घशाची खवखव - खोकला दूर राहण्याचा उपाय...

आजीच्या हातच्या सुंठगुळाच्या गोळ्या आठवतात ? घशाची खवखव - खोकला दूर राहण्याचा उपाय...

HOW TO MAKE IMMUNITY BOOSTER SAUNTH GUL GOLI HEALTH RECIPE : घसा दुखणे, खोकला, सर्दी हे पावसाळ्यात होणारे आजार लांब ठेवायचे तर एक सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 07:44 PM2023-08-24T19:44:34+5:302023-08-24T19:58:58+5:30

HOW TO MAKE IMMUNITY BOOSTER SAUNTH GUL GOLI HEALTH RECIPE : घसा दुखणे, खोकला, सर्दी हे पावसाळ्यात होणारे आजार लांब ठेवायचे तर एक सोपा उपाय

HOW TO MAKE IMMUNITY BOOSTER SAUNTH GUL GOLI HEALTH RECIPE. | आजीच्या हातच्या सुंठगुळाच्या गोळ्या आठवतात ? घशाची खवखव - खोकला दूर राहण्याचा उपाय...

आजीच्या हातच्या सुंठगुळाच्या गोळ्या आठवतात ? घशाची खवखव - खोकला दूर राहण्याचा उपाय...

सध्या सगळीकडे पावसाळी वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे. उन्हाळी वातावरण जाऊन पावसाळा सुरु झाला की आपल्याला आनंद होतोच. पावसाळी वातावरण म्हटलं की हवाबदल तसेच वातावरणात फरक दिसून येतो यामुळे आपले शरीर काही ना काही परिणाम दाखवायला सुरुवात करते. या बदलत्या वातावरणामुळे आपल्याला कधी खोकला होतो, तर कधी सर्दी आणि ताप, कधी घास खवखवतो. हवाबदलाचा सामना करायचा तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. मात्र तरीही हवाबदलामुळे आपल्याला काही त्रास झालाच तर लगेच डॉक्टरांकडे न पळता काही घरगुती उपचारांनी आपल्याला आराम मिळू शकतो. 

पावसाच्या पाण्यात भिजल्याने आपल्याला ताप, सर्दी, खोकला असे छोटे - मोठे आजार होतात, त्याचबरोबर एकाला झालं की मग हा संसर्ग घरातल्या सगळ्यांनाच होतो. या सगळ्या लहान - मोठ्या अजारातून पटकन बरे होण्यासाठी आपण सर्वप्रथम काही घरगुती उपचार करू शकतो. किरकोळ खोकला व  घसादुखीसाठी, स्वयंपाक घरातील काही पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. गूळ, हळद, सुंठ पावडर, आलं हे पदार्थ घशातील संसर्ग दूर करण्यासाठी प्रभावी असतात. तसेच ते घसा दुखणे, खोकला, खवखवणे आणि जळजळ होण्याची समस्याही दूर होते. या समस्या दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी सुंठ - गुळाच्या  गोळ्या बनवून ठेवू शकतो. या सुंठ - गुळाच्या गोळ्या (Immunity Booster Soonth goli ) नेमक्या कशा बनवायच्या ते पाहूयात (HOW TO MAKE IMMUNITY BOOSTER SAUNTH GUL GOLI HEALTH RECIPE).

साहित्य :- 

१. गूळ - १/२ कप (गूळ किसून बारीक केलेला)
२. सुंठ पावडर किंवा बारीक किसलेल आलं - २ ते ३ टेबलस्पून 
३. हळद - १ टेबलस्पून 


 

कृती :- 

१. सर्वप्रथम गूळ बारीक करून तो व्यवस्थित किसून घ्यावा.
२. बारीक किसून घेतलेला गूळ एका छोट्या भांड्यात घेऊन तो गॅसच्या मंद आचेवर त्याचा पाक होईपर्यंत संपूर्णपणे वितळवून घ्यावा. 
३. गूळ संपूर्णपणे वितळल्यांनंतर त्यात आपल्या आवडीनुसार सुंठ पावडर किंवा किसलेल आलं व हळद घालून घ्यावी.
४. हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. चमच्याने हे मिश्रण ढवळून घ्यावे. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

दूध प्यायला नाकं मुरडणारी मुलंही चटकन करतील ग्लास रिकामा, पाहा एक खास मिल्क मसाला ! एकदम टेस्टी गोष्ट...

५. गॅसच्या मंद आचेवर ठेवून हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत गरम करून घ्यावे. 
६. त्यानंतर हे मिश्रण एका वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यावे. 
७. आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे, थंड झालेल्या या मिश्रणाचे हातांनी वळून छोट्या छोट्या गोल गोळ्या बनवून घ्याव्यात.
८. या सुंठ गुळाच्या गोळ्या बनवून तयार झाल्यावर एका हवाबंद छोट्या बरणीत भरून ठेवाव्यात. 

पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला बरेचदा सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा छोट्या समस्या उद्भवत असतात अशावेळी आपण या सुंठ - गुळाच्या गोळ्या खाऊन घरगुती उपचार करु शकतो.

Web Title: HOW TO MAKE IMMUNITY BOOSTER SAUNTH GUL GOLI HEALTH RECIPE.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.