बटरचा (Butter) वापर अनेक पदार्थांमध्ये होतो. शिवाय अनेक जण भाज्यांमध्ये तेलाऐवजी बटरचा वापर करतात. तर काही जण नाश्त्यामध्ये बटर टोस्ट खातात. पण विकतचे बटर खाताना जरा भीतीच वाटते, कारण बरेचसे दुग्धजन्य पदार्थ हे भेसळयुक्त असतात. जर आपल्याला विकतचे बटर खायचे नसेल तर, आपण तुपाचा वापर करूनही घरच्या घरी बटर तयार करू शकता.
बनावटी बटरमुळे आरोग्याच्यानिगडीत गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे आरोग्याशी खेळ खेळण्यापेक्षा घरातच बाजारात मिळते तसे बटर तयार करा. बटर करण्यासाठी जास्त साहित्यांची गरज लागत नाही (Cooking Tips). फक्त तूप, मीठ आणि बर्फाच्या तुकड्यांचा वापर करून आपण घरच्या घरी बटर तयार करू शकता. शिवाय स्टोर करून ठेवल्यास महिनोमहिने आरामात टिकतात. चला तर मग बटर करण्याची सोपी कृती पाहूयात(How to make instant butter from ghee using a simple technique).
बटर करण्यासाठी लागणारं साहित्य
तूप
मीठ
गाजर हलवा कधी जास्त शिजतो, गचका होतो? गाजर हलवा परफेक्ट जमण्यासाठी ही घ्या कृती
बर्फाचे तुकडे
कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप रवाळ तूप घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. नंतर त्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घाला. व्हिस्करच्या मदतीने एका बाजूने फेटत राहा. जोपर्यंत तुपाचा रंग बदलत नाही, शिवाय घट्टपणा येत नाही, तोपर्यंत मिक्स करत राहा. तुपाचा रंग बदलला, यासह घट्टपणा आला की त्यातून बर्फाचे तुकडे काढून एका वाटीमध्ये ठेवा. तयार बटर एका हवाबंद डब्यात स्टोर करा.
बटर करण्याची ही प्रोसेस नेहमी थंड जागेवर करा. कारण यामुळे बटर व्यवस्थित तयार होईल. अशा प्रकारे बटर खाण्यासाठी रेडी. आपण याचा वापर कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी करू शकता.