चपाती हा आपल्या रोजच्या जेवणाचा एक मुख्य भाग आहे. काहींना तर चपाती खाल्ल्याशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतच नाही. या गोलाकार छोट्या चपात्या प्रामुख्याने गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात. गव्हाच्या पिठात योग्य प्रमाणात पाणी व तेल मिसळून मऊसूत कणिक मळली जाते. या मऊ कणकेपासून गोल पौष्टिक फुलके किंवा चपात्या रोजच्या जेवणात बनवल्या जातात. आपल्यापैकी बहुतांश लोक सकाळी नाश्त्याला चहासोबत चपाती खातात तसेच दुपारच्या जेवणाला देखील डब्यांत चपातीच नेतात.
भारतीय जेवणात वरण भात, भाजी पोळी या पदार्थांचा नेहमीच समावेश असतो. याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. चपातीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज आणि कार्ब्ज असतात. काहीवेळा आपल्याला सकाळच्या कामाच्या गडबडीत चपात्यांचे कणिक मळून चपात्या बनवण्या इतका वेळ नसतो. याचबरोबर आपण काहीवेळा कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करतो अशावेळी आपल्याला जेवण उपलब्ध होईलच असे नाही. अशा परिस्थितीत जर आपण चपात्या बनवून त्या स्टोर करून ठेवल्या तर त्या महिनाभर तरी चांगल्या टिकतात तसेच आपण कधीही घाईच्या वेळी या चपात्या काढून लगेच तयार करु शकतो. झटपट चपाती बनवून ती महिन्याभरासाठी स्टोर करून ठेवण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How To Make Instant Chapati Quickly At Home In Just 10 Minutes).
चपात्या स्टोअर करुन ठेवण्याची सोपी ट्रिक :-
१. सर्वप्रथम आपण चपाती बनवण्यासाठी रोज जशी गव्हाच्या पिठापासून कणिक तयार करुन घेतो, तशी मऊसूत कणिक मळून घ्यावी.
२. आता या मळलेल्या कणकेचे छोटे - छोटे गोळे करुन घ्यावेत.
स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...
३. आता नेहमीप्रमाणे या गोळ्यांच्या छोट्या गोलाकार पोळ्या लाटून घ्याव्यात.
४. यानंतर या चपात्या तव्यावर दोन्ही बाजुंनी अर्धवट शेकून घ्याव्यात. (चपात्या तव्यावर शेकताना त्यांना तेल लावू नये.)
सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...
नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....
५. या चपात्या दोन्ही बाजुंनी अर्धवट शेकून झाल्यानंतर थोड्या गार करुन घ्याव्यात.
६. या चपात्या गार झाल्यानंतर एकावर एक रचून ठेवाव्यात, या चपात्या एकावर एक रचून ठेवताना प्रत्येक चपातीच्या मध्ये एक बटर पेपर अंथरावा जेणेकरून चपात्या एकमेकांना न चिकटता व्यवस्थित राहतील.
७. आता या चपात्या एका झिप लॉक बॅगमध्ये व्यवस्थित पॅकिंग करुन फ्रिजरमध्ये ठेवाव्यात.
अशाप्रकारे आपण या चपात्या एकदा बनवून महिनाभर स्टोर करुन ठेवू शकतो. तसेच आपण जर प्रवास करणार असाल तर या चपात्या आपण प्रवासात घेऊन जाऊ शकता. याचबरोबर आपल्याला जेव्हा चपाती करून खायची असेल तेव्हा हव्या तेवढ्या चपात्या फ्रिजमधुन अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवाव्यात. त्यानंतर त्या तव्यावर दोन्ही बाजुंनी शेकून घ्याव्यात व खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.