Lokmat Sakhi >Food > जुही परमारची खास रेसिपी- फक्त ४ पदार्थ वापरून दिवाळीसाठी करा इंस्टंट रेसिपी- कुछ मिठा हो जाये...

जुही परमारची खास रेसिपी- फक्त ४ पदार्थ वापरून दिवाळीसाठी करा इंस्टंट रेसिपी- कुछ मिठा हो जाये...

How To Make Instant Coconut Barfi: दिवाळीत काही तरी वेगळा गोड पदार्थ करायचा असेल तर अभिनेत्री जुही परमार हिने शेअर केलेली ही एक खास रेसिपी एकदा बघा... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2023 06:10 PM2023-11-07T18:10:59+5:302023-11-07T18:15:23+5:30

How To Make Instant Coconut Barfi: दिवाळीत काही तरी वेगळा गोड पदार्थ करायचा असेल तर अभिनेत्री जुही परमार हिने शेअर केलेली ही एक खास रेसिपी एकदा बघा... 

How to make instant coconut barfi, instant coconut ladoo recipe by actress Juhi Parmar | जुही परमारची खास रेसिपी- फक्त ४ पदार्थ वापरून दिवाळीसाठी करा इंस्टंट रेसिपी- कुछ मिठा हो जाये...

जुही परमारची खास रेसिपी- फक्त ४ पदार्थ वापरून दिवाळीसाठी करा इंस्टंट रेसिपी- कुछ मिठा हो जाये...

Highlightsरेसिपी अगदी सोपी आहे, शिवाय झटपट होणारी.यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांसाठी ही कोकोनट बर्फी किंवा लाडू करून बघाच...

दिवाळीमध्ये विकतची मिठाई आणायची नसेल तर किंवा घरचे रवा, बेसन, बुंदी अशा पारंपरिक लाडूंपेक्षा काहीतरी वेगळी मिठाई पाहिजे असेल, तर ही एक रेसिपी एकदा ट्राय करा. ही रेसिपी अभिनेत्री जुही परमार हिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये मोजके पदार्थ वापरून मिठाई कशी करायची, हे तिने सांगितले आहे. रेसिपी अगदी सोपी आहे, शिवाय झटपट होणारी. यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांसाठी ही कोकोनट बर्फी किंवा लाडू करून बघाच...(instant coconut ladoo recipe by actress Juhi Parmar)

 

कोकोनट बर्फी किंवा लाडू करण्याची रेसिपी

साहित्य

१ कप दूध

३ टेबलस्पून पिठी साखर

१ कप मिल्क पावडर

चिंचपेटी, तन्मणी, मोत्याचे झुबे घ्यायचेत? ठसठशीत मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी आता करा अगदी बजेटमध्ये...

१ कप खोवलेला नारळ

१ टेबलस्पून तूप

४ ते ५ बदाम

 

रेसिपी

सगळ्यात आधी कढई गॅसवर तापायला ठेवा त्यात तूप, दूध टाका. दूध उकळल्यानंतर त्यात साखर आणि खोवलेला नारळ टाका. नंतर मिल्कपावडर घाला. सगळं मिश्रण आळून आल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.

पार्लरमध्ये जायला वेळच नाही? फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फेशियल, गोल्ड फेशियलसारखा चमकेल चेहरा

वर सांगितलेल्या पद्धतीने मिठाई करण्याऐवजी तुम्ही ही दुसरी पद्धतही वापरू शकता. त्यासाठी कढईमध्ये आधी तूप टाका. तूप तापल्यानंतर त्यात नारळ टाकून खमंग परतून घ्या. नारळ परतून झाल्यानंतर त्यात दूध आणि मिल्क पावडर टाका. सगळं मिश्रण जेव्हा आळून येईल तेव्हा त्यात साखर घाला. आता पुन्हा सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहा. यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या बर्फी करा किंवा मग लाडू वळून घ्या. 

 

Web Title: How to make instant coconut barfi, instant coconut ladoo recipe by actress Juhi Parmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.