कॉफी हे जगभर अतिशय लोकप्रिय असलेले पेय म्हणून ओळखले जाते. आपल्यापैकी प्रत्येकालाच दिवभरातून किमान दोन ते तीन वेळा कॉफी पिण्याची सवय असतेच. कधी कंटाळा आला, काम करून थकवा आला तर ही मरगळ घालवून तरतरी येण्यासाठी कॉफी पिणे पसंत केले जाते. एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये गेलो तर त्यांच्या कॉफीचा मेन्यू बघूनच डोकं चक्रावतं. कॉफीचे इतके प्रकार अस्तित्वात असतात हे पाहूनच खूप आश्चर्य वाटत. मग यांतील कॉफीच्या प्रत्येक प्रकाराची चव घेण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. कॅफेसोबतच आपण काहीवेळा घरच्या घरी कोल्ड कॉफी किंवा नॉर्मल दुधाची कॉफी बनवतोच.
कॉफी हे रोज आवर्जून प्यायले जाणारे पेय आहे. काहींना तर सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिण्याची सवयच असते. काहीवेळा आपण सकाळी कामाच्या गडबडीत असतो अशावेळी आपल्याला कॉफी बनवण्यासाठी वेळ नसतो. अशा परिस्थिती झटपट होणारी इन्स्टंट कॉफी कुणीतरी द्यावी अशी इच्छा मनात निर्माण होते. रोज सकाळी उठून कॉफी बनवण्याची गडबड करण्यापेक्षा आपण इन्स्टंट कॉफीचे क्युब्स घरच्या घरीच बनवून ठेवू शकतो. आपल्या गरजेनुसार आपण हे कॉफीचे तयार क्युब्स गरम किंवा थंड दुधात घालून झटपट व जास्तीचे कष्ट न घेता चटकन कॉफ़ी बनवू शकतो. इन्स्टंट कॉफीचे क्युब्स नेमके कसे तयार करावेत हे पाहूयात(How To Make Instant Coffee In Just 2 Minutes Using Coffee Cubes).
साहित्य :-
१. पाणी - २ ते ३ कप २. साखर - २ ते ३ टेबलस्पून ३. कॉफी - २ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी मंद आचेवर उकळवून घ्यावे. २. पाणी उकळ्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार, साखर घालावी. साखर घालून झाल्यावर ती साखर संपूर्णपणे पाण्यांत विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहावे. ३. संकजर संपूर्णपणे पाण्यात विरघळवून त्याचे शुगर सिरप करून घ्यावे. ४. शुगर सिरप तयार झाल्यावर त्यात कॉफी पावडर घालावी. ही कॉफी पावडर पाण्यांत संपूर्णपणे एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे.
थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...
स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...
५. आता हे तयार झालेले मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. ६. हे मिश्रण थंड झाल्यावर बर्फाचा एक ट्रे घेऊन त्यात हे तयार केलेले कॉफीचे मिश्रण ओतावे. ७. आता हा ट्रे फ्रिजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यावा. ८. ७ ते ८ तासानंतर या बर्फाच्या ट्रे मध्ये तयार कॉफीचे क्युब तयार होतील. ९. आता आपण आपल्या आवडीनुसार, थंड दुधात हे कॉफीचे क्युब्स घालून झटपट इन्स्टंट कॉफी लगेच तयार करु शकतो.
कॉफी क्युब्स पासून तयार झालेली इन्स्टंट कॉफी पिण्यासाठी तयार आहे.