Join us  

How to make instant dahi vada : चहाबरोबर खाण्याचा बटर घ्या अन् २ मिनिटांत करा चवदार दही वडे; इंस्टंट रेसिपी, चवीला भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 4:02 PM

How to make instant dahi vada : दही वडे खायला अनेकांना आवडतात पण ते बनवणं अवघड वाटतं.

नेहमीच्या जेवणात तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी चविष्ट, चटपटीत खावंसं वाटतं.  घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून काहीतरी नवीन पदार्थ बनवला तर तितकाच जेवणात बदल वाटतो आणि खाणाऱ्यांनाही आनंद वाटतो.  उन्हाळ्याच्या दिवसात दह्याचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. (How to make Instant Dahi Vada)

दह्यापासून बनवलेल्या काही पदार्थांचा आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही या उन्हाळ्यात वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता. (Instant Dahi Vada Recipe) दही वडे खायला अनेकांना आवडतात पण ते बनवणं अवघड वाटतं. चहाबरोबर खाण्याचा बटर वापरून तुम्ही १० मिनिटात चवदार दही वडे बनवू शकता. (Dahi Vada Recipe)

कृती

एका भांड्यात दही ५०० ग्रॅम, मीठ १/२ टीस्पून, साखर 1 टीस्पून घालून एक मिश्रण एकजीव करा. नंतर त्यात ६ भिजवलेले बटर घाला.  20 सेकंद पाण्यात ठेवा आणि बाहेर काढा. आता  एका भांड्यात बटर, दही, हिरवी चटणी, जिरे पावडर, लाल तिखट, गोलगप्पा मसाला, चिंच गूळाची चटणी एकत्र करून हे इस्टंट दही वडे सर्व्ह करा. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स