Lokmat Sakhi >Food > ना दही, ना सोडा ५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा डोसा; १ कप पीठात १० डोसे-पाहा इंस्टंट रेसिपी

ना दही, ना सोडा ५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा डोसा; १ कप पीठात १० डोसे-पाहा इंस्टंट रेसिपी

How to Make Instant Dosa : स्वयंपाक घरात उपलब्ध असलेलं साहित्य वापरून कुरकुरीत डोसा लगेच तयार होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 08:39 AM2024-07-29T08:39:00+5:302024-07-29T08:40:01+5:30

How to Make Instant Dosa : स्वयंपाक घरात उपलब्ध असलेलं साहित्य वापरून कुरकुरीत डोसा लगेच तयार होईल.

How to Make Instant Dosa : Instant Wheat Flour Dosa Recipe with Cooking Tips | ना दही, ना सोडा ५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा डोसा; १ कप पीठात १० डोसे-पाहा इंस्टंट रेसिपी

ना दही, ना सोडा ५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा डोसा; १ कप पीठात १० डोसे-पाहा इंस्टंट रेसिपी

नाश्त्याला इडली, डोसा असे पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडते पण अनेकदा हे पदार्थ बनवणं कठीण वाटतं. पीठ आंबवणं,  पीठ वाटणं ही किचकट प्रोसेस करावी लागू नये यासाठी अनेकजण बाहेरून डोसा आणतात. डोसा करण्यासाठी प्रत्येकवेळी पीठ आंबवण्याची,  डाळ-तांदूळ भिजवण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने गव्हाचं पीठ वापरून डोसा बनवू शकतात. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेलं साहित्य वापरून कुरकुरीत डोसा लगेच तयार होईल. (How to Make Instant Dosa)

गव्हाच्या पीठाचा डोसा कसा करायचा? (Instant Wheat Flour Dosa Recipe)

1) गव्हाच्या पीठाचा डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा कप गव्हाचे पीठ घ्या.   त्यात १ कप तांदूळाचे पीठ घाला, १ छोटा चमचा जीरं, चवीनुसार मीठ हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या. सुरूवातीला अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर हळूहळू पाण्याचे प्रमाण वाढवून पातळ मिश्रण तयार करा.  हे झाल्यानंतर १० मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवा.

दिवसभरात भरपूर चालणं होतं तरी पोट सुटतंय? चालताना १ गोष्ट करा, भराभर घटेल वजन

2) १० मिनिटांनी त्यात बारीक चिरलेला कांदा घाला, पातळ चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, १० ते १२ बारीक चिरलेले कढीपत्ते, १ बारीक चिरलेली मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात १ कप पाणी अजून घालून मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. 


3) नॉनस्टिक तव्याला तेल लावून घ्या.  डोश्याचे मिश्रण व्यवस्थित ढवळून एका वाटीत किंवा खोल चमच्यात हे भरा. तवा गरम झाल्यानंतर डोश्याच्या आकाराप्रमाणे गोलाकार हे मिश्रण पसरवा. गॅसची फ्लेम मिडीयम करून त्यावर थोडं तेल घाला.

गव्हाच्या कणकेत 'हा' पदार्थ मिसळून चपाती करा; वजन-कोलेस्टेरॉल दोन्ही पटकन होईल कमी

4) २ मिनिटांनी गॅसची फ्लेम कमी करा. डोसा ब्राऊन झाल्यानंतर हलक्या हाताने काढून घ्या. तयार आहे कुरकुरीत गव्हाच्या पीठाचा डोसा. हा डोसा तुम्ही खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी किंवा सांबारबरोबर खाऊ शकता. 

Web Title: How to Make Instant Dosa : Instant Wheat Flour Dosa Recipe with Cooking Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.