'चटणी' या पदार्थाला भारतीय थाळीमध्ये विशेष असे स्थान आहे. आपल्याकडील थाळीमध्ये अनेक प्रकारच्या ओल्या व सुक्या चटण्या वाढल्या जातात. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी चटणी पुरेशी असते. तोंडी लावायला म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या घरात बनवून ठेवतो. या सर्व चटणीच्या प्रकारांत अतिशय लोकप्रिय असणारी व सर्वांना आवडणारी, झटपट होणारी अशी हिरवी चटणी (Green Chutney). कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, खोबर असे साधे सोपे साहित्य वापरून ही झटपट चटणी तयार करू शकतो. हिरवी चटणी अगदी बेचव जेवणाची देखील चव वाढवते.
कोथिंबिर - मिरचीची हिरवी चटणी ही मल्टिपर्पज चटणी आहे असे आपण म्हणू शकतो. ही आपण अनेक पदार्थांबरोबर जसे की भेळ, समोसा किंवा कोणत्याही चाट, इडली, उत्तपम, किंवा पराठयांबरोबरही खाऊ शकता. ही बनवायला अगदी सोपी आहे व कधीही झटपट बनविता येते. फ्रिज मध्ये ठेवल्यास ही १० ते १५ दिवस चांगली टिकून राहते. हिरवी चटणी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. परंतु प्रत्येक वेळा ही चटणी बनवण्यासाठी वेळ असेलच असे नाही. काहीवेळा कामाच्या घाईगडबडीत किंवा पुरेसे साहित्य नसल्यामुळे आपण ही चटणी आयत्यावेळी बनवू शकत नाही. अशावेळी या चटणीचे प्रिमिक्स (How To Make Instant Green Chutney Premix Powder) बनवून आपण स्टोअर करून ठेवू शकतो व आपल्याला हवी तेव्हा ही इन्स्टंट चटणी बनवून खाऊ शकतो. इन्स्टंट चटणी प्रिमिक्स बनवण्याची सोपी कृती पाहूयात(Homemade green chutney premix for chutney lovers).
साहित्य :-
१. पुदिना - १ कप
२. कोथिंबीर - १ कप
३. कडीपत्ता - ५ ते ६ पाने
४. लसूण पाकळ्या - ४ ते ५ पाकळ्या
५. आलं - १ इंचाचा छोटा तुकडा
६. हिरव्या मिरच्या - ५ ते ६
७. भाजलेली चणा डाळ - १ कप
८. काळीमिरी - ४ ते ५ दाणे
९. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
१०. चाट मसाला - १ टेबलस्पून
११. जिरे पावडर - १ टेबलस्पून
१२. मीठ - चवीनुसार
१३. सैंधव मीठ - १/२ टेबलस्पून
बाजारातून विकत आणलेले लादी पाव ताजे आहेत की शिळे हे कसे ओळखाल ? ८ टिप्स, खा ताजे मऊ पाव...
कृती :-
१. गॅसच्या मंद आचेवर पॅन ठेवून तो गरम करून घ्यावा. आता त्यात पुदिना, कोथिंबीर, कडीपत्ता, लसूण पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या घालून घ्याव्यात.
२. हे सगळे जिन्नस थोडे कोरडे होईपर्यंत पॅनमध्ये परतून घ्यावेत. थंड होण्यासाठी बाजूला ठेवावेत.
ग्रेव्हीत दही घातल्यानंतर ते फुटू नये म्हणून मास्टर शेफ पंकज भदौरिया सांगतात ३ सोप्या ट्रिक्स...
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
३. एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळे जिन्नस घेऊन त्यात भाजलेली चणा डाळ, काळीमिरी, आमचूर पावडर, चाट मसाला, जिरे पावडर व चवीनुसार मीठ, सैंधव मीठ घालून घ्यावे.
४. आता या सगळ्या मिश्रणाला वाटून घेऊन त्याची बारीक पूड बनवून घ्यावी.
५. ही मिक्सरमध्ये तयार झालेली पूड बारीक गाळणीमध्ये ओतून गाळून घ्यावी.
रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...
आपले इन्स्टंट हिरव्या चटणीचे प्रिमिक्स तयार आहे. हे प्रिमिक्स एका हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवावे. आपल्याला चटणी हवी तेव्हा हे प्रिमिक्स एका बाऊलमध्ये काढून त्यात पाणी घालून चमच्याने ढवळून घ्यावे. चटणी खाण्यासाठी तयार आहे.