Lokmat Sakhi >Food > ना उकड घ्यायचं टेंशन, ना सारणाची - ना तळणाची घाई ! गॅसही न पेटवता करता झटपट मोदक...

ना उकड घ्यायचं टेंशन, ना सारणाची - ना तळणाची घाई ! गॅसही न पेटवता करता झटपट मोदक...

How To Make Instant Kaju Modak Without Using Gas : हे घ्या प्रसादासाठी खास झटपट मोदक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 04:07 PM2023-09-11T16:07:41+5:302023-09-14T12:32:03+5:30

How To Make Instant Kaju Modak Without Using Gas : हे घ्या प्रसादासाठी खास झटपट मोदक रेसिपी...

How To Make Instant Kaju Modak Without Using Gas. | ना उकड घ्यायचं टेंशन, ना सारणाची - ना तळणाची घाई ! गॅसही न पेटवता करता झटपट मोदक...

ना उकड घ्यायचं टेंशन, ना सारणाची - ना तळणाची घाई ! गॅसही न पेटवता करता झटपट मोदक...

गणपती बाप्पाच्या आगमची आपण सगळेच कायम वाट बघत असतो. गणपती येणार म्हणून त्याच्या स्वागताला आपण गोडधोड पदार्थ बनवतो. या गोड पदार्थात त्याचा आवडीचा सगळ्यात मुख्य पदार्थ म्हणजे मोदक. मोदकांशिवाय गणपती बाप्पाच्या नैवेद्याची थाळी पूर्ण होऊच शकत नाही. गणेशोत्सव आणि मोदक (Modak) हे एक समीकरणच बनले आहे. आपण आतापर्यंत उकडीचे किंवा तळणीचे मोदक खाल्लेच असतील. परंतु बदलत्या काळानुसार या मोदकांमध्ये देखील नावीन्य आलेले आपल्याला पहायला मिळते. काही घरात मोदक हे पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. यासोबतच चॉकलेट मोदक, काजू मोदक (Kaju Modak), माव्याचे मोदक असे अनेक प्रकारचे मोदक आजकाल बाहेर सहज विकत मिळतात. 

कोणत्याही पद्धतीने मोदक बनवायचे म्हटले की खूप मोठा घाट घालवा लागतो. मोदक बनवायचे म्हटलं की, मोदकाचे पीठ भागवा, उकड काढा, सारण तयार करा अशी तारेवरची कसरत करावी लागते. पण अगदी कमी साहित्यात व गॅसचा वापर न करता (Modak Without Using Gas) झटपट मोदक बनवता येऊ शकतात, असे सांगितल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही. यंदाच्या गणेशोत्सवात आपण इंस्टंस्ट काजू कतली मोदक (Instant Kaju Katli Modak Recipe) घरच्या घरी झटपट बनवू शकतो. हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची उकड किंवा सारण बनवण्याचा घाट घालावा लागत नाही. इंस्टंस्ट काजू कतली मोदक (Kaju Katli Modak Recipe) बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Instant Kaju Modak Without Using Gas).

साहित्य :- 

१. काजू - १ ते २ कप 
२. पिठीसाखर किंवा आयसिंग शुगर - १ कप 
३. मिल्क पावडर - १/२ कप 
४. पाणी - ५ ते ६ टेबलस्पून 
५. चांदीचा वर्ख - (पर्यायी)

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

कृती :- 

१. सर्वप्रथम काजू एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची थोडी जाडसर भरड करुन घ्यावी. 
२. ही मिक्सरमध्ये बारीक झालेली भरड एका बारीक चाळणीतून चाळून घ्यावी. 
३. चाळून घेतलेल्या काजू पावडरमध्ये पिठीसाखर, मिल्क पावडर घालून मग त्यात ५ ते ६ टेबलस्पून पाणी घालून घ्यावे. 

श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

४. आता हे तयार झालेले पीठ मोदकाच्या साच्यात भरुन त्याला मोदकाचा आकार द्यावा. 
५. मोदक तयार झाल्यानंतर या मोदकांवर आपण आपल्या आवडीनुसार चांदीचा वर्ख लावून सजवू शकतो. (पर्यायी) 

श्रावण स्पेशल : नेहमीची मऊ भगर खाऊन कंटाळा आला असेल तर करा 'भगर पुलाव', वरीच्या तांदळाचा चविष्ट पदार्थ...

अशाप्रकारे आपण गॅसचा वापर न करता झटपट होणारे इन्स्टंट काजू मोदक घरच्या घरी बनवू शकतो.

Web Title: How To Make Instant Kaju Modak Without Using Gas.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.