ढोकळा खायला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मऊ, चवदार ढोकळे नाश्त्याला खाण्यासाठी लोकांची पहिली पसंती असते. (How to make instant khaman dhokla)घरी ढोकळा बनवणं पण तितकंच सोपं आहे घरी ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावा लागणार नाही. अगदी १० ते १५ मिनिटांत ढोकळा बनून तयार होईल. (Why my dhokla is not cooked properly) घरी बनवलेले ढोकळे फुलत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं. योग्य पद्धत वापरून तुम्ही घरच्याघरी परफेक्ट ढोकळा बनवू शकता. (How to make perfect dhokla at home)
ढोकळा बनवण्याची परफेक्ट पद्धत
१) खमन ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ कप बेसन पिठात १ कप दही घाला. नंतर त्यात आलं-मिरचीची पेस्ट, हळद, मीठ आणि पाणी घालून एकजीव करा. या पाण्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. एका भांड्याला तेल लावा.
२) ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो आणि ४ ते ५ थेंब पाणी घालून एकजीव करून हे बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात भरा. वरून लाल तिखट घालून ढोकळा वाफवण्यासाठी एका पाणी घातलेल्या भांड्यात ठेवा.
३) ढोकळ्याचे चौकोन कापून घ्या. तेलात मोहोरी, तीळ, मीठ, मिरच्या घालून फोडणी तयार करा. या फोडणीत पाणी घालून हे मिश्रण ढोकळ्यावर घाला. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा ढोकळा.
ढोकळा विकतसारखा बनण्यासाठी टिप्स
ढोकळा परफेक्ट बनवण्यासाठी सगळ्यात आधी ढोकळा व्यवस्थित चाळून घ्या. त्यासाठी तुम्हाला एक बाऊल आणि चाळणीची आवश्यकता असेल. यामुळे बेसनात गुठळ्या राहणार नाही आणि परफेक्ट मिश्रण बनेल. ढोकळा सॉफ्ट बनवण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणं गरजेचं असतं. एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर न फेटता हळूहळू पाणी घालून बॅटर फेटा. तुम्ही हे मिश्रण हाताने सुद्धा फेटू शकता. जर तुम्ही दोन्ही बाजूने मिश्रण फेटत राहाल तर मिश्रणातील हवा बाहेर पडेल आणि ढोकळा सॉफ्ट फल्फी होणार नाही.
जास्त हळद घातल्यनं रंग चांगला येईल असा लोक विचार करतात पण हळदीला हिट मिळाल्यानंतर त्याचा रंग डार्क व्हायला सुरूवात होते. यामुळे ढोकळ्याचा रंग बिघडू शकतो. म्हणून ढोकळ्यात कमी प्रमाणात हळद घाला. बेकिंग सोडा घातल्यानंतरही ढोकळा फुलत नाही अशी तक्रार अनेकांची असते. बेकिंग सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिश्रण ढवळा आणि २० ते २५ मिनिटांसाठी झाकण ठेवून द्या. नंतर ढोकळा बनवा.