Join us  

ओट्सचा इन्स्टंट-पौष्टिक डोसा आणि चमचमीत टोमॅटो चटणी! तोंडाला चव येईल अशी रेसिपी, झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 1:15 PM

Food and recipe: ब्रेकफास्टला काही तरी झटपट आणि तेवढंच हेल्दी आणि टेस्टी बनवायचा विचार करत असाल तर सेलिब्रिटी  शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur) यांनी सांगितलेली ही इन्स्टंट ओट्स डोसा आणि टोमॅटो चटणी रेसिपी ट्राय करून बघा.. 

ठळक मुद्देहा डोसा चवीला तर छान आहेच, पण अतिशय पौष्टिकही आहे.. घरातल्या मोठ्या मंडळींसोबत लहान मुलेही अगदी आवडीने खातील असा.

इन्स्टंट डोसा (instant dosa) अनेक जणी बऱ्याचदा करतात आणि काही मैत्रिणी त्यात अगदी एक्सपर्ट देखील असतात. पण तरीही नविन काही दिसलं की ते करून बघायला अनेक जणींना आवडतं... म्हणूनच तर ही एक मस्त रेसिपी घ्या... ओट्सचा झटपट होणारा डोसा.. हा डोसा चवीला तर छान आहेच, पण अतिशय पौष्टिकही आहे.. घरातल्या मोठ्या मंडळींसोबत लहान मुलेही अगदी आवडीने खातील असा. डोसासोबत (instant oats dosa)  खाण्यासाठी कुणालने (recipe by Kunal Kapur) एक टोमॅटो चटणी रेसिपीही (tomato chutney recipe) सांगितली आहे.. ती देखील नक्की करून बघा म्हणजे डोसा आणखी लज्जतदार लागेल.. 

 

शेफ कुणाल यांनी या व्हिडिओच्या सुरुवातीला डोसाला दोसा असं म्हणा असं सांगितलं आहे. दक्षिणेकडच्या राज्यात दोसा असं म्हणतात. पण आपण मराठीत त्याला डोसा असंच म्हणतो.. डोसा असो, दोसा असो किंवा मग dosa असो.. काय पाहिजे ते म्हणा, पण ही रेसिपी मात्र नक्कीच करून बघा..

ओट्सचा गरमागरम डोसा, चटणी आणि सोबत G2 या कंपनीचा पिझापास्ता किंवा मस्त चटकदार मुगडाळ , सकाळी अशी छान क्रंची-टेस्टी चव असेल ताटात तर दिवसभर मूड छान राहणारच!

कसा करायचा इन्स्टंट डोसा?How to make instant oats dosa?- अर्धा कप रोल्ड ओट्स अर्धा कप पाणी एक बाऊलमध्ये ५ ते ७ मिनिटांसाठी भिजत ठेवा.- पॅन गरम करायला ठेवा. त्यामधे दीड टेबलस्पून उडीद डाळ टाका. ती चांगली भाजून घ्या. डाळ थंड झाली की मिक्सरमध्ये टाकून तिची बनवा. उडीद दाळीची पावडर टाकल्याने ओट्स डोसा क्रंची बनतो. 

- आता ओट्स भिजले की वरचे पाणी टाकून द्या. उरलेले पाणी गाळणीने गाळून घ्या. आणि भिजवलेले ओट्स मिक्सरच्या भांड्यात टाका. - त्यात थोडीशी हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडासा कांदा, कढीपत्ता, मेथीचे दाणे, कोथिंबीर हे सगळं त्यात टाका आणि हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. हवं तर त्यात थोडंसं पाणी टाका. फक्त मिश्रण खूप सैलसर व्हायला नको, नाहीतर डोसे करायला त्रास होतो.- यानंतर या पीठात चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर आणि उडीद डाळीची पावडर टाका. आता हे मिश्रण डोसा करण्यासाठी तयार आहे. याचे तुम्ही नेहमीप्रमाणे गरमागरम डोसे करू शकता.

 

टोमॅटो चटणी रेसिपी..How to make tomato chutney?- डोसा खायचा म्हटला की त्यासाठी चटणी उत्तम जमलीच पाहिजे... तरच त्याची मजा येते... म्हणूनच ही चटणी रेसिपीही करून बघा.. - चटणी करण्यासाठी पॅन गरम करा. त्यात सुकलेली लाल मिरची, जिरे, हरबरा डाळ, उडीद डाळ असं  सगळं टाका आणि थोडं भाजून घ्या. 

- यानंतर त्यात खोबरं, आलं,  हिरवी मिरची, कढीपत्ता टाका आणि हे मिश्रण पुन्हा थोडंसं भाजून घ्या. थंड झालं की त्यात थोडं पाणी टाका आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हा झाला चटणीचा मसाला.- आता पॅनमध्ये तेल टाका. तेल गरम झालं की त्यात हिंग टाका. आपण तयार केलेला मसाला आणि कश्मिरी लाल तिखट, मीठ, धने पूड असं सगळं टाका.- या मसाल्याला जेव्हा तेल सुटेल तेव्हा त्यात फ्रेश टोमॅटो प्युरी घाला. ही चटणी थोडावेळ शिजू द्या.- त्यानंतर त्यात थोडा गूळ आणि चवीनुसार मीठ टाका. थोडा कढीपत्ता टाका. चटणी शिजली की गॅस बंद करा..- ही चटणी फ्रिजमध्ये तुम्ही आठवडाभरासाठी नक्कीच स्टोअर करू शकता. 

 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुणाल कपूरकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.