आपल्याकडील भारतीय जेवणाच्या थाळीत लोणचं, पापड, चटण्या या पदार्थांना विशेष महत्व आहे. हे तोंडी लावण्यासाठीचे विशेष पदार्थ इतर जेवणाची देखील लज्जत वाढवतात. उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवून आपण वर्षभर पुरतील अशा प्रकारे साठवून ठेवतो. यासोबतच आपण काहीवेळा पापड बाजारांतून विकत देखील आणतो. आपल्याकडे शाही जेवणाचा काही खास बेत असला किंवा सणावाराला, खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पापड हा लागतोच. त्याशिवाय थाळी पूर्ण झाली असे वाटत नाही.
पापडांमध्ये देखील विविध प्रकारचे पापड असतात. साबुदाण्याचे, उडदाचे, बटाट्याचे असे असंख्य प्रकारचे पापड बाजारांत उपलब्ध असतात. हे पापड आपण जेवणासोबत कधी तळून तर कधी भाजून खाणे पसंत करतो. काहीजणांना जेवण सुरु करण्याआधी स्टार्टर म्हणून मसाला पापड खायला देखील अतिशय आवडतो. असेच आपण पापडा पासून अनेक रेसिपी बनवून रोजच्या जेवणाची चव अधिक वाढवू शकतो. काहीवेळा पापड हे इतके कुरकुरीत असतात की तळून झालयावर ते व्यवस्थित ठेवले नाही तर त्याचा लगेच चुरा होतो. असा हा चुरा झालेला पापड फेकून न देता आपण त्याची एक साधी सोपी झटपट होणारी रेसिपी बनवू शकतो(How To Make Papad Chaat At Home).
साहित्य :-
१. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)२. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेला)३. काकडी - १ कप (बारीक चिरलेली)४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)५. मीठ - चवीनुसार६. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ७. चाट मसाला - १ टेबलस्पून ८. लिंबाचा रस - १ ते २ टेबलस्पून ९. उडदाचे पापड - २ ते ३ (तळलेले किंवा भाजून घेतलेले)
धो - धो कोसळणाऱ्या पावसात चमचमीत खावंसं वाटतंय? घ्या चणा गार्लिक फ्राय करण्याची चटकदार रेसिपी...
कृती :-
१. सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, काकडी बारीक चिरुन घ्यावे. २. आता एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्रित करुन घ्यावे. ३. त्यानंतर यात चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, चाट मसाला घालून घ्यावा. हे सगळे मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून एकजीव करुन कोशिंबीर तयार करुन घ्यावी.
अस्सल गावरान झणझणीत चवीचं मेथी पिठलं खाऊन तर पाहा, पावसाळ्यातला झक्कास बेत!
महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...
४. आता उडदाचे २ ते ३ पापड आपण आपल्या आवडीनुसार तळून किंवा भाजून घ्यावेत. ५. या पापडाचा हलकाच चुरा करुन किंवा त्याचे किंचित छोटे तुकडे होतील इतका हाताने मोडून घ्यावा. ६. आता या मोडलेल्या पापडाचा चुरा तयार कोशिंबीरवर भुरभुरवून घ्यावा. ७. त्यानंतर या तयार पापड चाटवर थोडासा लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
पापड चाट खाण्यासाठी तयार आहे. मसाले भात, पुलाव, बिर्याणी यांसोबत आपण हे पापड चाट तोंडी लावण्यासाठी म्हणून सर्व्ह करु शकता.