पावभाजी म्हटलं सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. (Pav Bhaji Kashi karaychi) पावभाजी बाहेरून आणतात तर काहीजण घरात खातात. पावभाजी घरी बनवायचं म्हटलं की खूपच किचकट काम वाटतं. (Cooking Hacks) पावभाजी करायची म्हटलं की खूपच वेळ जातो. म्हणूनच बरेच लोक घरी बनवण्याापेक्षा बाहेरून पावभाजी आणणं पसंत करतात. घरच्याघरी कमी साहित्यात चविष्ट पावभाजी कशी बनवता येईल ते पाहूया. (Instant Pav Bhaji Recipe) कमीत कमी वेळात ही डिश बनून तयार होईल. पावभाजीची इंस्टट रेसिपी पाहूया. (Instant Pav Bhaji Recipe)
इंस्टंट पावभाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
१) फ्लॉवर - एक वाटी
२) गाजराचे काप- अर्धी वाटी
३) सोललेले मटार -अर्धी वाटी
३) बारीक चिरलेले बटाटे- २ मध्यम आकाराचे
४) बारीक चिरलेली कोथिंबीर -पाव वाटी
५) बारीक चिरलेल्या मोठ्या हिरव्या मिरच्या - ४
६) लाल मिरची पावडर- १ चमचा
७) बटर किंवा तूप- ३ चमचे
८) शिमला मिरची- अर्धी वाटी
९) मीठ- चवीनुसार -
१०) पाव भाजी मसाला -२ ते ३ चमचे
११) हळद-अर्धा चमचा
१२) बारीक चिरललेला कांदा - एक वाटी
१३) आलं-लसूणाची पेस्ट- २ चमचे
१४) बारीक चिरलेला टोमॅटो- १ वाटी
इस्टंट पावभाजी कशी करायची? (How to Make Instant Pav Bhaji)
1) पावभाजी करण्यासठी सगळ्यात आधी कुकरमध्ये कोबी, मटार, गाजर, बटाटा, टोमॅटो, हळद, मीठ, शिमला मिरची आणि दोन कप पाणी घालून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत उकळवून घ्या. भाज्या व्यवस्थित झिजल्यानंतर २ ते ३ चमचे तूप त्यात घाला.
२) एका कढईत तेल घालून कांदा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात आलं-लसणाची पेस्ट गालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात सुके मसाले हळद, लाल मिरची, मीठ, गरम मसाला आणि पाव भाजी मसाला घालून व्यवस्थित भाजून घ्या.
कंबर-गुडघ्यांचं दुखणं फार वाढलंय? बाबा रामदेव सांगतात ५ पदार्थ खा-हाडं ठणकणंच होईल बंद
३) शिट्ट्या काढून घेतल्यानंतर झाकण उघडून भाज्या मॅश करा आणि कांदा, आलं-लसूण याचे मिश्रण घालून मिक्स करा. थोड्या वेळाने उकळ येईपर्यंत शिजवत राहा. आता तव्यात बटर किंवा तूप घालून ब्रेड किंवा पाव दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. एका वाटीत भाजी काढून घ्या. त्यावर धण्यांची पानं, कांदा, लिंबाचा रस घालून गार्निश करा. नंतर पावबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
पावभजी करण्याच्या सोप्या टिप्स (Pav Bhaji Recipe)
१) कुकरमध्ये भाद्या घालत असताना भाज्यांचा आकार लहान ठेवा. जेणेकरून त्या लवकर शिजतील.
२) भाज्यांमध्ये पाणी घालताना कंजूसी करू नका. अन्यथा भाज्या शिजण्याच्या आधीच जळतील.
स्लिम फिगर हवीये-प्रोटीन खाणं महाग वाटतं? १० रुपयांत वाटीभर चणे खा, भरपूर प्रोटीन मिळेल-फिट राहाल
३) मसाल्यांमध्ये फक्त हळद, मिरची, गरम मसाला घातला तर चव येणारर नाही. यात पावभाजी मसाला न चुकता घाला.
४) जास्त मसाला घातल्याने भाजी कडवट होऊ शकते म्हणून कमीत कमी प्रमाणात घाला.